जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:19+5:30

गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण्यातील पोलीस पॉझिटिव्ह ठरला आहे. राजुरा येथील तेलंगणा राज्यातून प्रवास केलेली युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.

The number of victims in the district is 495 | जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४९५

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४९५

Next
ठळक मुद्दे३११ कोरोनातून बरे : नव्या २८ बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या ४९५ झाली आहे. यापैकी ३११ बाधित बरे झाले आहेत तर १८४ जण उपचार घेत आहेत. गुरूवारी एकूण २८ नवे बाधित पुढे आले आहेत.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. बाधित दुरुस्त होण्याचा दर राज्यात ५७.१४ असताना जिल्ह्यात हा दर ६४ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ६३१ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या चार महिन्यांमध्ये ९० हजार २८२ नागरिक परत आलेले आहे. तर ६० हजारांवर नागरिक जिल्ह्यातून बाहेर गेले आहेत.
गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण्यातील पोलीस पॉझिटिव्ह ठरला आहे. राजुरा येथील तेलंगणा राज्यातून प्रवास केलेली युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील पुरुष संपर्कातून बाधित ठरला आहे. नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील युवक बाधित ठरला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता.
चंद्रपुरातील पठाणपुरा सवारी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे. ब्रह्मपुरी येथील कुडेसावलीतील पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. कागज नगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असलेला सिंदेवाही तालुक्यातील २३ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. अफगाणीस्तानातून परत आल्यानंतर श्वसनाचा आजार जाणवू लागल्यामुळे दुर्गापूर वार्ड, चंदू बाबा गेट जवळील ४९ वर्षीय व २० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. याशिवाय नागभीड येथील वार्ड क्रमांक सहामधील बुधवारी निघालेल्या दोन पॉझिटिव्हच्या संपर्कातील दोन युवक व २० वर्षीय महिला अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे. नागभीड येथील सिनेमा टॉकीज परिसरातील ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील महिला व केवळ नऊ दिवसांची मुलगी अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.
चंद्रपूर येथील बागडे हाऊस वार्ड नंबर १६ मधील ३२ वर्षीय पुरुष अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: The number of victims in the district is 495

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.