नवविवाहित पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:59+5:30

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिचा विवाह मूळच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी गावच्या किशोर खाटीक यांच्याशी झाला. आई अपंग आणि वडिलाचे छत्र हरपलेल्या रुचिताचा विवाह मामाने तीन महिन्यांपूर्वी लावून दिला होता. अशातच पती किशोर चंद्रपुरात नोकरीला होता. हे पती-पत्नी चंद्रपुरात सुखाने नांदत होते. अशातच काही दिवसांपूर्वी रुचिता माहेरी भंगाराम तळोधीला आली. पत्नी माहेरी गेल्याने पत्नीविना न करमल्याने किशोरदेखील भंगाराम तळोधीत दाखल झाला.

The mystery of the death of the newly weds remains | नवविवाहित पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ कायम

नवविवाहित पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ कायम

ठळक मुद्दे पोलीस तपास सुरू : पतीवर चिमुरात स्वगावी अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : तालुक्यातील भंगाराम तळोधीत रविवारी नवविवाहित गर्भवती महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला. सोमवारी तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना पतीनेही पेटत्या चितेवर उडी मारली. यावेळी उपस्थितांनी त्याला चितेबाहेर ओढले. मात्र स्वत:ला संपविण्याचा निर्धार केलेल्या पतीने चितेलगतच्या विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. सोमवारी उशिरा पतीच्या शवविच्छेदनानंतर त्याच्यावर चिमुरातील स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आला. अल्पावधीतच सुखी संसाराचा शेवट झाला. मात्र या नवविवाहित पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिचा विवाह मूळच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी गावच्या किशोर खाटीक यांच्याशी झाला. आई अपंग आणि वडिलाचे छत्र हरपलेल्या रुचिताचा विवाह मामाने तीन महिन्यांपूर्वी लावून दिला होता. अशातच पती किशोर चंद्रपुरात नोकरीला होता. हे पती-पत्नी चंद्रपुरात सुखाने नांदत होते. अशातच काही दिवसांपूर्वी रुचिता माहेरी भंगाराम तळोधीला आली. पत्नी माहेरी गेल्याने पत्नीविना न करमल्याने किशोरदेखील भंगाराम तळोधीत दाखल झाला. कुठलाच वादविवाद नसताना रविवारी रुचिता घराबाहेर पडली. बराच वेळ घरी न परतल्याने शोधाशोध केली असता तिचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत आढळून आला. दुसऱ्याच दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना किशोरनेही आत्महत्या केली. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पती-पत्नीच्या संसारात वितुष्ट नव्हते, हे विशेष.

Web Title: The mystery of the death of the newly weds remains

टॅग्स :Policeपोलिस