शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे धरणे

By admin | Updated: October 19, 2016 04:40 IST

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढून धरणे आंदोलन करण्यात आले

मुंबई : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढून धरणे आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी, परभणी जिल्ह्यातील तालुक्यांत तसेच हिंगोली आणि खान्देश, रायगडमधील अलिबाग, सोलापुरातही तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. मराठवाड्यात मोर्चे, धरणेमंगळवारी मराठवाड्यातही ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने मुस्लीम मोर्चे काढून धरणे धरले. बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लातूर जिल्ह्यात औसा व चाकूर तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला़ औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, वैजापूर, खुलताबाद, कन्नड व गंगापूर येथे मोर्चे काढून धरणे आंदोलन करण्यात आले. परभणीत पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू, जिंतूर, गंगाखेड व पालम येथे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ हिंगोलीत मोर्चा काढून आंदोलकांनी तीन तास जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. रत्नागिरीत समाज रस्त्यावररत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.खान्देशात आंदोलनखान्देशात जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.भारत मुक्ती मोर्चा, शिवराय विचार मंच, स्वराज फाउंडेशन,संभाजी ब्रिगेडसह विविधसामाजिक संघटनांनी सहभागी होत मागण्यांना पाठिंबा दिला. शिरपूरमध्ये (जि. धुळे) मुस्लीम समाजातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सोलापुरातही आवाज घुमला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाबरोबरच मुस्लिमांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा काझी सय्यद अहमद अली यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)