शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईतील विलंबामुळे मंत्रालयानेही खडसावले

By admin | Updated: May 16, 2015 01:40 IST

चंद्रपुरात अवैध बांधकाम फोफावले आहे. पहिल्या टप्प्यात यातील २६ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्तांनी कालबध्द कार्यक्रम आखला होता.

चंद्रपुरातील अवैध बांधकाम : तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशचंद्रपूर : चंद्रपुरात अवैध बांधकाम फोफावले आहे. पहिल्या टप्प्यात यातील २६ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्तांनी कालबध्द कार्यक्रम आखला होता. मात्र अनेक महिने लोटूनही प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. आता नगर विकास मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून अवैध बांधकामाविरुध्दची कारवाई तात्काळ करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहे. मागील काही वर्षात शहरात वाट्टेल तसे बांधकाम करण्यात आले आहे. मनपानेही याकडे वेळीच लक्ष दिले नाही. दरम्यान मनपाच्या एका आमसभेत शहरातील वाढत्या अवैध बांधकामाचा मुद्दा उचलून धरण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलीे. अवैध बांधकामे तोडण्याचा कालबध्द कार्यक्रमच मनपाने तयार केला होता. याबाबत आयुक्त सुधीर शंभरकर यांनी एक आदेशच काढला आहे. यात नगररचना विभागाने अवैध बांधकामाची निश्चिती करावी, क्षेत्रीय अभियंत्यांनी त्या स्थळावर जाऊन लाल रंगाने अवैध बांधकामावर नोंद करावी, अग्निशमन अधिकारी आणि प्रभारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून पोलिसांच्या सहकार्याने अवैध बांधकाविरुध्द कारवाई करावी, असे निर्देश होते. पहिल्या टप्प्यात २६ अवैध बांधकामावर ही कारवाई होत असल्याचा तेव्हा बराच गाजावाजा करण्यात आला होता. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही नोटीस बजावण्यापलिकडे कुठलीच ठोस कारवाई महापालिकेकडून झाली नाही. विशेष म्हणजे, मनपा प्रशासनाच्या कालबध्द कार्यक्रमानुसार, मार्चअखेरपर्यंत शहरातील अवैध बांधकामे, निदान पहिल्या यादीतील ती २६ बांधकामांवर कारवाई होणे अपेक्षित होते. दरम्यान, अवैध बांधकामाविरुध्दच्या कारवाईला विलंब होत असल्याने मनपाच्या नगरसेविका सुनिता लोढिया यांनी १२ मे २०१५ रोजी या संदर्भात नगर विकास मंत्रालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी आयुक्त सुधीर शंभरकर यांना एक पत्र पाठवून नियमानुसार अवैध बांधकामाविरुध्द तात्काळ कारवाई करून कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. आता थेट मंत्रालयानेच याची दखल घेतल्यानंतर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे. केवळ शहरातच नाही, तर शहरालगतच्या नव्या वस्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. (शहर प्रतिनिधी)