शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा कोळसा व स्क्रॅबची चोरी

By admin | Updated: June 16, 2017 00:32 IST

वेकोलि माजरी क्षेत्राची ‘मदर माईन्स’ म्हणून ओळखली जाणारी माईन नं. ३ भूमिगत कोळसा खाण गेल्या दोन वर्षांपूर्वी बंद झाली.

सीटू युनियनची तक्रार : चौकशी करून कारवाई करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरी क्षेत्राची ‘मदर माईन्स’ म्हणून ओळखली जाणारी माईन नं. ३ भूमिगत कोळसा खाण गेल्या दोन वर्षांपूर्वी बंद झाली. त्यानंतर या ठिकाणी नागलोन फेज-२ खुली कोळसा खाण सुरु करण्यात आली. या खाणीत माती काढण्याचे कंत्राट गुजरात येथील रणजीत बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीचे मालक कंपनीतील काही लोकांना हाताशी धरून वकोलिचा लाखो रूपयांचा कोळसा व स्क्रॅब साहित्य चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चोरीचे प्रकरण उघडकीस येताच या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन सीटू कामगार संघटनेचे महासचिव विरेंद्र ्रप्रसाद गौतम यांनी माजरी पोलीस ठाणे, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी व खाण सुरक्षा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.रणजीत बिल्डकॉन खाजगी कंपनीच्या परिसरात वकोलिचे ३०० ते ४०० टन कोळसा व लाखोंच्या किमतीचे स्क्रॅब साहित्य आढळले आहे. याचा पुरावा म्हणून फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. याची भनक कंपनीला लागताच कंपनीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत कंपनीचे अर्पित पटेल, गोविंद मेहरा, अरविंद दमारे, हार्दिक पटेल यांनी रातोरात सदर कोळसा व सहित्याची विल्हेवाट लावली. चोरी केलेल्या कोळसा व स्क्रॅब सहित्याची विल्हेवाट लावण्याकरिता मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कंपनीच्या डोजर मशीन ५ जी १०५९४, पीसी मशीन १२ सी ४६० बीएलसी, वॉल्वो एबी ३३९६, ३३९७ व ग्रेडर सीजी ०४ डीटी ५६९ या वाहनांचा वापर करण्यात आला आहे, असे सीटू युनियनने तक्रारीत म्हटले आहे.कंपनी मालक व या प्रकरणात सहभागी असणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करून कंपनीचे कंत्राट ताबडतोब रद्द करण्यात यावे, अशी लेखी तक्रार सीटू संघटनेने केली आहे. यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक अर्पित पटेल यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाबाबत काहीही सांगू शकत नाही. कंपनीच्या मालकाशी संपर्क करा, असे उत्तर दिले.