शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सभा

By admin | Updated: November 16, 2015 00:55 IST

२६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान दिनानिमित्त संविधान जागृत अभियानाच्या अनुषंगाने इंडस्ट्रीयल वार्ड चंद्रपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले.

चंद्रपूर : २६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान दिनानिमित्त संविधान जागृत अभियानाच्या अनुषंगाने इंडस्ट्रीयल वार्ड चंद्रपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला मार्गदर्शक म्हणून पी.आर. बोरकर, राजस खोब्रागडे, कांबळे उपस्थित होते. त्रिशरण पंचशिल ग्रहण करून सभेची सुरूवात करण्यात आली. सभेचे अध्यक्ष महादेव शामकुळे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पी.आर. बोरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान देशाला अर्पण केले आणि त्यानंतर २६ जानेवारी १९५० ला संविधान अंमलात येवून संपूर्ण भारतात जनतेचे राज्य निर्माण झाले. प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या धर्माचा स्वतंत्र प्रचार आणि प्रसार करण्याची संधी या संविधानाच्या माध्यमातून प्राप्त झाली. त्याच्या कर्तव्याची, हक्काची, अधिकाराची, स्वातंत्र्याची, न्यायाची, बंधूतेची, समानतेची, समान संधी प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमानेतून प्राप्त झाली आहे. म्हणून भारतीय संविधानाला जगात श्रेष्ठ समजल्या जाते. आणि यामुळेच संपूर्ण भारतवासी या संविधानामुळे एकोप्याने नांदत आहेत. संविधानात कोणत्याही एका धर्माला महत्व दिले नसून सर्व धर्म, पंथ यांना समान अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक नागरिकास स्वतंत्र काम करण्याची, बोलण्याची, निवडणुकीत उभे राहण्याची समान संधी याद्वारे प्राप्त झाली आहे. म्हणून भारतीय संविधानच देशाला तारक आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान सम्मान रॅलीमध्ये चंद्रपुरातील सर्वधर्मीय जनतेनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे अशी विनंती यावेळी राजस खोब्रागडे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)