शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: December 11, 2015 01:32 IST

तालुक्यातील गोरजा येथील १९ वर्षीय विवाहितेने लग्नाच्या सातव्या महिन्यांतच सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पैशाचा तगादा : लग्नानंतर सात महिन्यांतच आत्महत्याभद्रावती: तालुक्यातील गोरजा येथील १९ वर्षीय विवाहितेने लग्नाच्या सातव्या महिन्यांतच सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरुन पती, सासू व भासऱ्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.प्रिया सतीश रोडे (१९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. माहेरहून टीव्ही, गॅस शेगडी, नवीन गाडी व नवीन घर बांधण्यासाठी, पती सतीश रोडे, सासू शोभा रोडे व भासरे संदीप रोडे हे नेहमी मारहाण करुन शारिरीक व मानसीक छळ करायचे. त्यामुळे प्रिया रोडे ही त्रस्त होती. त्यांच्या जाचाला कंटाळून प्रियाने आत्महत्या केली, अशी तक्रार मृत मुलीचे वडील अरुण बापुराव ठावरी यांनी पोलिसात केली.अरुण बापुराव ठावरी रा. विरंकूड ता. वणी जि. यवतमाळ यांची मुलगी प्रिया हिचे तालुक्यातील गोरजा येथील सतीश ऊर्फ सचिन रोडे यांच्यासोबत २६ एप्रिल २०१५ ला रितीरीवाजाप्रमाणे लग्न झाले. विवाहानंतर दोन महिने सुखी संसार थाटल्यानंतर हिला सासरच्या मंडळीकडून नेहमीच मारहाण होत होती. राखी या सणानिमित्त प्रिया ही माहेरी गेली असता तिने सासरी होणारा प्रकार सांगितला. नवीन दिवाळीसाठी प्रिया ही पुन्हा माहेरी गेली असता तिची प्रकृती खालावलेली दिसली. तिच्या डोळ्याला दुखापत होती. याबाबत वडिलांनी विचारणा केली असता पैसाचा तगादा लावत पती, सासू व भासऱ्यांनी मारहाण केल्याचे प्रियाने सांगितले. याशिवाय शेजारच्याशी बोलणे बंद केले. घरातून बाहेर निघण्यास परवानगी नव्हती, ही सर्व बाब मोबाईलद्वारे सांगण्याच्या प्रयत्न केला असता पती व सासू जवळ राहायचे, असेही तिने सांगितले. त्यामुळे सासरी जाणार नाही, असा हट्ट तिने धरला होता. मात्र, वडिलांनी प्रियाची समजूत घालून जावई सतीशमध्ये सुधारणा होईल, या हेतूने मुलीला सासरी पाठविले. दरम्यान, काल बुधवारी तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळूनच प्रियाने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडील अरुण ठावरी यांनी पोलिसांत.पोलिसांनी आरोपी सतिश रोडे (पती), शोभा रोडे (सासू) संदीप रोडे (भासरे) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर ३०६, ३०४ (ब) ४९८ (अ) ३४ भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)