शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:48+5:30

जून महिन्यांमध्ये चंद्रपुरातील बाजारपेठ शालेय साहित्यांनी सजलेल्या असतात. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स, वॉटरबॅग, स्कूलबॅग आदींनी दुकाने सजली आहेत. लॉकडाऊनमध्ये दोन महिने कामधंदा नसल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. शालेय साहित्य विकत घ्यायला बहुतांश पालकांकडे पैसे नाहीत.

The market flourished with educational materials | शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ फुलली

शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ फुलली

ठळक मुद्देवस्तुची मागणी घटली : स्टेशनरी व्यावसायिक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्व शाळा सत्र संपण्यापूर्वीच बंद करण्यात आल्या. परंतु, अनेक शाळा ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा नेहमीप्रमाणेच सुरू होतील, या आशेने शालेय साहित्य विक्री करणाऱ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी दुकानात साहित्य विक्रीस ठेवले आहे. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू झाल्याने पालक अद्याप साहित्य खरेदीसाठी येत नसल्याने दुकानदार चिंतित आहे.
जून महिन्यांमध्ये चंद्रपुरातील बाजारपेठ शालेय साहित्यांनी सजलेल्या असतात. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स, वॉटरबॅग, स्कूलबॅग आदींनी दुकाने सजली आहेत. लॉकडाऊनमध्ये दोन महिने कामधंदा नसल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. शालेय साहित्य विकत घ्यायला बहुतांश पालकांकडे पैसे नाहीत. जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. त्यामुळे दरवर्षीसारखी शालेय साहित्य घेण्याची पालकांची तयारी नाही. बाजारपेठेत विविध प्रकारच्या लहानग्यांना आकर्षित करतील अशा वह्या उपलब्ध आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, अभिनेता, अभिनेत्री यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगाच्या व आकाराच्या बॅग्ज बाजरात आल्या आहेत. यावर कार्टुन्सची चित्रे, बाबी डॉल, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेल्या बॅग तसेच टिफीन विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र बाजारपेठेत ग्राहकच नसल्याचे एका विक्रेत्यांनी सांगितले.

नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध
जूनच्या सुरवातीपासून दुकानामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे बाजारपेठ शैक्षणिक साहित्यांनी साजली असूनही यावर्षी ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.
बारावीचा अभ्यासक्रम बदलला असून त्याच्याही पुस्तके, गाईड बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
दहावीची पुस्तके व गाईडही उपलब्ध आहेत. मात्र त्यासुद्धा पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थी येत नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

Web Title: The market flourished with educational materials

टॅग्स :Schoolशाळा