पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:22+5:30

कोरोना विषाणूने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीबरोबरच आघात केला. त्यामुळे बदलत्या काळानुसार जगण्याचा आटापिटा करावा लागत आहे. रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेत असलेले सर्वसामान्य कुटुंंब होरपळून निघत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आता पाच महिने होत आहेत. या काळात लॉकडाऊन झाल्याने विविध राज्यात रोजगारासाठी गेलेली जनता तिथेच अडकली होती.

Many have changed occupations for the stomach | पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचा तडाखा : आठवडी बाजार बंद झाल्याने बुडाला रोजगार

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : कोरोना विषाणूचा पाच महिन्यापासुन जिल्ह्यात कहर सुरू आहे. त्यामुळे गरीबांचे हाल होत आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्या हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. लहान व्यावसायिकांना ग्रामीण भागातील आठवडी बाजारांचा मोठा आधार होता. जिल्हा प्रशासनाने बाजार बंद केल्याने ेअनेकांनी अनेकांना आपला मूळ व्यवसाय बदलविला. विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती थोडी बरी होती त्यांनी नवीन व्यवसाय स्वीकारला. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे विक्रेते आज ना उद्या आठवडी बाजार सुरू होईल या आशेवर मिळेल ती कामे करीत आहेत.
कोरोना विषाणूने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीबरोबरच आघात केला. त्यामुळे बदलत्या काळानुसार जगण्याचा आटापिटा करावा लागत आहे. रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेत असलेले सर्वसामान्य कुटुंंब होरपळून निघत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आता पाच महिने होत आहेत. या काळात लॉकडाऊन झाल्याने विविध राज्यात रोजगारासाठी गेलेली जनता तिथेच अडकली होती. कठीण प्रसंगातुन आपल्या मूळगावी आली खरी मात्र रोजगाराचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने गहू व तादुंळ मोफत दिले. परंतु, अन्नासाठी लागणारे तेल, तिखट व भाजीपाला घेण्यासाठी पैसे लागतात. कोरोनामुळे अशा उपेक्षित, वंचित घटकांचा रोजगार हिरावला. व्यवसायच ठप्प झाल्याने किराणा सामान व भाजीपाला कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध प्रकारच्या घरगुती वस्तू विक्री करणाऱ्या किरकोळ विके्रत्यांचा रोजगार हिरावला. ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे त्यांनी पर्यायी व्यवसाय शोधला. पण, त्यामध्ये जम बसविणे दूरच राहिले. या हंगामी व्यवसायातून काही दिवस ढकलता आले तरी मोठा आधार आहे, अशी व्यथा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

भाजी विकणाऱ्यांचीच संख्या अधिक
कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी प्रशासनाने केवळ जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला विक्रीलाच परवानगी दिली आहे. त्यामुळे आठवडी बाजारात प्लास्टीक वस्तू, लोखंडी अवजारे, हॉटेल, चहा विक्री करणारे बेरोजगार झाले. उदरनिर्वाहासाठी पर्याय शोधला नाही तर कुटुंबाचे हाल होतील, या भितीपोटी जुन्या व्यवसायाचा माल घरीच गुंडाळून ठेवला आणि शहरातील वार्डावार्डात फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. तालुकास्थळावरील विक्रेत्यांनाच हे शक्य झाले. मात्र, खेड्यातील लहान विक्रेत्यांच्या व्यवसायाचे बंद झाले आहेत.

पोटाची भूक की आरोग्य?
भाजीपाला व्यतिरिक्त इतर किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे दिसून येते. ‘घरी सामान आहे मात्र विकू शकत नाही’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ‘पोटाची भूक की आरोग्य’ या संकटात सर्वसामान्य सापडले आहेत. गावात फिरून किरकोळ व्यवसाय करण्यास ३१ आॅगस्टनंतर तरी परवानगी मिळेल, याकडे विक्रेत्यांच्या नजरा लागल्या.

लघु उद्योग बंद कामगार बेरोजगार
लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम गटातील ३ हजार २८६ लघु व्यवसाय सुरू होते. यामध्ये १ लाख ६६१ लोकांना रोजगार मिळत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जिल्हा व राज्यबंदी लागू झाल्याने लघु उद्योगांची चाके थांबली. ७५ टक्के कामगारांना रोजगार नाही. कामच नसल्याने मिळेल ती कामे करून गाडा हाकावा लागत आहे.

रोजगाराअभावी कुटुंबीय तणावात
आर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे आठवडी बाजारातील अनेकांकडे भांडवल नाही. भांडवल जमविले तर अन्य गावात फिरून व्यवसाय करण्याची परवागनी नाही. फेरीवाले, कापड विक्रेते, लोखंडी अवजारे, शेतकºयांना लागणाºया दैनंदिन वस्तू, उदीळ, मूग, चवळी, धने, तूर, जवस, मोट, हरभरा दाळ, तूर दाळ, पोपटी, वाल, आदी कडधान्ये विकून उदरनिर्वाह करणाºया लहान व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. रोजगार बुडाल्याने शेकडो कुटुंबिय आर्थिक तणावात आहेत.

Web Title: Many have changed occupations for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.