शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या सर्वेक्षण कंत्राटात मनपाचे गौडबंगाल

By admin | Updated: December 2, 2015 00:43 IST

चंद्रपूर शहरातील स्थावर मालमत्तांच्या सर्वेक्षण करण्याचे काम दिलेल्या कंपनीचा अल्पकाळाचा अनुभव लक्षात घेता ..

आपचा आरोप : भरमसाठ करवाढीच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरणारचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील स्थावर मालमत्तांच्या सर्वेक्षण करण्याचे काम दिलेल्या कंपनीचा अल्पकाळाचा अनुभव लक्षात घेता या कंपनीला सर्वेेक्षणाचे काम देण्यात गौडबंगाल असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.दरम्यान, चंद्रपूरकरांवर पडणाऱ्या भरमसाठ मालमत्ता करवाढीचा विरोध दर्शविण्यासाठी आणि ती मागे घेण्यासाठी आपने ३ डिसेंबरला चंद्रपुरात एका मोर्चाचेही आयोजन केले आहे.या संदर्भातील माहिती देण्यासाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सुनील मुसळे, अ‍ॅड. राजेश विराणी, माणिक सावरकर, सूर्यकांत चांदेकर, अशोक आनंदे, भीवराज सोनी आदींनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून महानगर पालिकेने दिलेल्या कंत्राटाच्या मंजुरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ६ सप्टेंबर २०१४ च्या महानगर पालिकेच्या ठराव क्रमांक ७९ नुसार कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कंपनी प्रा. लिमी. या कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे कंत्राट दिले आहे. प्रत्यक्षात ही कंपनी १८ मार्च २०१४ रोजी पंजिबद्ध झालेली असताना मुल्यांकनाचे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे भाग भांडवल फक्त पाच लाख रूपयांचे असतानाही ६ कोटी रूपयांच्या कामाचे कंत्राट महानगर पालिकेने कोणत्या आधारावर दिले, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.चंद्रपूर शहरात झोन क्रमांक एक मधील नागरिकांना या संदर्भात फेरमुल्यांकनाच्या नोटीस मनपाने बजावल्या असून नागरिकांनी या संदर्भात रोष व्यक्त केला आहे. दोन हजार १०० नागरिकांनी आपच्या आवाहनानुसार तक्रारी आणि आक्षेप दाखल केले असून हा प्रश्न आप आंदोलनाच्या माध्यमतून उचलणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.नवे कर लावण्याला आणि करवाढीला विरोध नाही, मात्र ही करवाढ अवाजवी असून मुल्यांकन योग्य न झाल्याच्या तक्रारी आहेत. एकाच स्वरूपाच्या मालमत्तेसाठी वेगवेगळे कर लावण्याचा प्रकार अनाकलनिय आहे. या कंपनीला कामाचा अनुभव नाही, तज्ज्ञ आणि अनुभवी कर्मचारी नाही, असे असतानाही कंपनीला कामाचे कंत्राट मिळावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या कंपनीने कंत्राट मिळविताना बोगस कागदपत्रे सादर केली की मनपाने कागदपत्रे पहाताना डोळझाक केली याची शहानिशा व्हावी, अशीही मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)