शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

अज्ञान, आरोग्य आणि गरिबी यातून कुपोषण जन्माला येते. त्यामुळे या तिनही घटकांवर वरोरा तालुक्यामध्ये माता व बाल कुपोषण निर्मूलन समितीचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे.

सुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलन समितीचा गौरवचंद्रपूर : अज्ञान, आरोग्य आणि गरिबी यातून कुपोषण जन्माला येते. त्यामुळे या तिनही घटकांवर वरोरा तालुक्यामध्ये माता व बाल कुपोषण निर्मूलन समितीचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. तुम्ही संपूर्ण जिल्ह्याला प्रेरणा देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र ही लढाई पुढेही जोमाने लढायची असून जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणण्यासाठी आपला लढा आणखी तीव्र करा, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येन्सा, टेभुर्डा, भटाळा, चिनोरा व कोंढाळा या गावांमधील माता व बाल कुपोषण समितीने वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात या भागामध्ये उत्कृष्ठ कार्य केले आहे. गावा गावांमध्ये जावून त्यांनी महिलांमध्ये कुपोषणाच्या संदर्भात प्रत्यक्ष भेटी देवून शुन्य दिवसांपासूनच्या कुपोषणावर कशी मात करायची, याबाबत प्रबोधन केले आहे. बुधवारी अशा गटांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सत्कार केला.यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, बारा बलुतेदारांच्या समाज रचनेतून आणि पारंपरिक सण उत्सवाच्या परंपरेतून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने कुपोषणाला सुरुवात झाली. कुपोषणाचा प्रश्न हाताळताना अज्ञान दूर करणे, उत्तम आरोग्य राखणे आणि परिस्थितीमुळे आरोग्य व आहार न मिळणे या संकटाशी लढणे गरजेचे आहे. त्यांनी यावेळी डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी जिल्ह्यात हिरकणी कक्षासाठी सुरु केलेल्या मोहिम व प्रचाराबद्दल त्यांचे कौतुक केले. सहा महिन्यापर्यंत मातेचे दूध नवजात शिशुला आवश्यक असून आत्मसन्मानाने स्तनपान करता यावे यासाठी सर्व जागांवर व्यवस्था व्हावी. यासाठीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री संजय देवतळे, जिल्हा परिषद सभापती जिवतोडे, वरोऱ्याच्या सभापती रोहिणी देवतळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, संरपच मारोतराव झाडे आदी उपस्थित होते. आरोग्य केंद्रांना सर्व सोयीयुक्त बनविणार जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र महाराष्ट्रातील सर्वाधिक सोयीयुक्त बनवायचे आहे. हा आपला संकल्प असून मानव विकास मानांकन वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण, आरोग्य व रोजगार या मुद्यांवर जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मदरडेअरी सोबत चर्चा झाली असल्याचे यावेळी ना. मुनगंटीवार सांगितले.