शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी पुरूष अधीक्षकाकडे

By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वरोरा शहरात आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे.

वरोरा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वरोरा शहरात आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहाची जबाबदारी मागील एक वर्षापासून पुरूष अधीक्षक सांभाळत आहेत. या अधीक्षकाकडे परत एका वसतिगृहाचा प्रभार आहे. महिला अधीक्षक नसल्याने वसतिगृहातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर अंतर्गत वरोरा शहरात मागील काही वर्षापासून मुलीचे वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या ८० मुली वास्तव्यास आहेत. मागील वर्षी महिला अधीक्षक निवृत्त झाल्यानंतर आज एक वर्षाचा कालावधी लोटूनही या ठिकाणी महिला अधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्या मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक असलेल्या व्यक्तीकडे मुलींच्या वसतिगृहाचा प्रभार देण्यात आला आहे. प्रभारी तेही पुरुष अधीक्षक असल्याने वसतिगृहातील मुलींना आपल्या समस्या सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुली व सोबतच विद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या मुलींचा वसतिगृहात समावेश असल्याने लहान मुलींचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाने वसतिगृहामध्ये अनेक सुविधा उपलब्ध केल्या. त्यानंतर अलिकडेच जाहिर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुलीच्या वसतिगृहाला सुरक्षा भिंत बांधण्याकरिता तरतूददेखील करण्यात आली आहे. अशा सर्व सुविधा शासन निर्माण करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. तर दुसरीकडे वरोऱ्यात मुलींच्या वसतिगृहात स्त्री अधिक्षकाचे पद मागील एक वर्षांपासून रिक्त ठेवून ही जबाबदारी पुरुष अधीक्षकाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात चिमूरचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता महिला अधीक्षक पदाच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यातून निवड झाल्यानंतर तातडीने मुलीच्या वसतिगृहात महिला अधीक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)