महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:15+5:30

अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे.

Mahavir celebrates the birth welfare festival | महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा

महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा

Next
ठळक मुद्देलाकडाऊनमुळे इतर धार्मिक उत्सव रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर सकल जैन समाजाद्वारे घरोघरी भक्तीभावपूर्ण वातावरणात महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देशावर ओढवलेले संकट दूर करण्याची प्रार्थना करण्यात आली.
अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे.
चंद्रपूर येथील सकल जैन समाजातर्फे दररोज ७०० लोकांना भोजन पुरविले जात आहे. भगवान महाविरांच्या जन्म महोत्सवानिमित्त जेवणासोबत प्रसाद म्हणून बुंदी व शेवदेखील देण्यात आली. जैन समाजातर्फे घरोघरी भक्तांबर पाठ, प्रार्थना तसेच नवकार मंत्राचे जप करण्यात आले.
यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया, योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, डॉ. महावीर सोईतकर, राज पुगलिया, फेन भंडारी यांच्या नेतृवात संदीप बाठिया, जितेंद्र चोरडिया, अभय ओसवाल, नरेश तालेरा, तुषार डगली, जितेंद्र मेहर, पकंज मुथा, जितेंद्र जोगड, अमित बैद, अनिल बोथरा, प्रफुल्ल बोथरा, सुरेश चंडालिया, यशराज मुनोथ, आनंद तालेरा, प्रतिक कोठारी, दीपक मोदी ऋषभ सकलेचा इत्यादी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या परिसरात जेवण तसेच प्रसाद वितरित करण्यास मदत केली.

Web Title: Mahavir celebrates the birth welfare festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.