म. फुले शेतकरी योजनेची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:37+5:30

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेतंर्गत निर्धारित अटीचे व शर्थीचे पालन करीत योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थामार्फत महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मंबई यांच्या निर्देशानुसार म. ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

M Implement the flower farmer scheme | म. फुले शेतकरी योजनेची अंमलबजावणी करा

म. फुले शेतकरी योजनेची अंमलबजावणी करा

ठळक मुद्देकुणाल खेमनार : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेतंर्गत निर्धारित अटीचे व शर्थीचे पालन करीत योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थामार्फत महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मंबई यांच्या निर्देशानुसार म. ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुनर्गठन, फेरपनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या दोन लाखापर्यंतचे आंत कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यानी राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना शेतकºयांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्ज विचारात घेण्यात येणार आहे.
सदर योजनेसाठी पात्र शेतकºयांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक असल्याने ७ जानेवारी २०२० पर्यंत आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बँकाकडून शेतकऱ्याचे कर्ज खात्यांची माहिती एक फ्रेबुवारीपासून संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्याची खाती आधार क्रमांकाशी लिंक आहे त्या पात्र शेतकऱ्याच्या कर्ज खाती कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, शिखर बॅकेचे व्यवस्थापक, शंभुनाथ झा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी. एस. धोटे व निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: M Implement the flower farmer scheme