शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

हत्या करून अपघाताचा देखावा करणाऱ्यास जन्मठेप

By admin | Updated: April 8, 2016 00:53 IST

एका इसमाची हत्या करून त्याचा अपघात झाला, असा देखावा करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

चंद्रपूर : एका इसमाची हत्या करून त्याचा अपघात झाला, असा देखावा करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ५ जानेवारी २०१४ रोजी जगदीश पंचवानी हे अष्टभुजा रेल्वे पुलाजवळ जखमी अवस्थेत पडून असलेले आढळले. त्यांच्या बाजुला त्यांची दुचाकीही पडली होती. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी जगदीश पंचवानी यांना रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली असेल, असा प्राथमिक अंदाज होता. दरम्यान, डॉक्टरांनी पंचवानी यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सदर घटना अपघात नसून घातपात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी ११ जानेवारी २०१४ रोजी रवी दुर्गाराम कनकुंटलवार याला अटक केली. अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी साक्षिदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे आरोपी रवी कनकुंटलवार यास बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. (शहर प्रतिनिधी)