गावात घुसून बिबट्याचा इसमावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST2021-07-14T04:33:19+5:302021-07-14T04:33:19+5:30

सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास संपूर्ण गाव झोपले असताना बिबट्या गावात घुसला. गावातील मनोहर बुधा मडावी यांच्या घरी कोबड्यांवर ...

A leopard enters the village and attacks Isma | गावात घुसून बिबट्याचा इसमावर हल्ला

गावात घुसून बिबट्याचा इसमावर हल्ला

सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास संपूर्ण गाव झोपले असताना बिबट्या गावात घुसला. गावातील मनोहर बुधा मडावी यांच्या घरी कोबड्यांवर हल्ला चढवला. कोंबड्यांची आरडाओरड ऐकू आल्याने मनोहर मडावी बाहेर निघले. या वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने गावकरी धावून आले. त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र मनोहर मडावी जखमी झाले. त्यांना लगेच उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या वेळी वनरक्षक सचिन टेकाम, अतिशिघ्र दलाचे वनरक्षक सुनील नगारे, वनमजूर नामदेव काळे उपस्थित होते.

Web Title: A leopard enters the village and attacks Isma