घरफोडून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST2020-12-04T04:57:11+5:302020-12-04T04:57:11+5:30

विनोद हनुमंतप्रसाद अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे भाऊ रमेश झंवर हे २९ नोव्हेंबर २०२० रोजी नागपूर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले ...

Lampas with jewelery worth Rs 3.5 lakh | घरफोडून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

घरफोडून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

विनोद हनुमंतप्रसाद अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे भाऊ रमेश झंवर हे २९ नोव्हेंबर २०२० रोजी नागपूर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर फोडून ७ हजार रोख रकमेसह ३ लाख ४९ हजारांचे सोने चांदीचे दागिणे लंपास केले. दागिण्यांमध्ये ब्रेसलेट, अंगठी, मंगळसूत्र, सोन्याची साखळी, कानातील डुल, बेसर, नेकलेस आदींचा समावेश असल्याचे तक्रारीत नमुद केले. पोलिसांनी घराचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. दुसºया घटनेत बसस्थानक परिसरातील शिवलहरी ले आऊटमध्ये राहणाºया राजेंद्र मून यांच्या घरीही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दोन मंगळसुत्र, डोरले, सोन्याची साखळी, अंगठी असे एकूण एक लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार मून यांनी केली. दहा दिवसात शहरात चोरीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पुढील तपास ठाणेदार नरेंद्र कोसुरकर करीत आहेत.

Web Title: Lampas with jewelery worth Rs 3.5 lakh