शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कुंभरे यांचे मारेकरी मोकाटच

By admin | Updated: November 11, 2014 22:37 IST

वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही.

नागभीड : वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे.वैजापूर (टोली) येथील मनोहर मारोती कुंभरे (६५) गावातच मासेमारी करून उदरनिर्वाह करायचे. २ नोव्हेंबर रोजी ते दुपारी ३ च्या सुमारास मासेमारी करण्यासाठी घरून निघाले. सायंकाळपर्यंत मासेमारी केली आणि त्या मासोळ्या जवळच असलेल्या गोपाळ टोली यथे विकल्या आणि गावाकडे निघाले. पण ते घरी पोहचलेच नाही.३ नोव्हेंबर रोजी सकाळी शेताकडे आणि शौचास जाणाऱ्या गावकऱ्यांना मनोहरचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. सकृतदर्शनी हा खुनाचाच प्रकार असल्याने पोलिसांनीही याप्रकरणी भादंवीच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेला आता जवळपास १० दिवसाचा कालावधी लोटला आहे. परंतु, पोलीस मनोहर कुंभरे यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचू शकलेले नाही. याबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान ८ नोव्हेंबरला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रिया जनबंधू यांनी घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीत खुनाबद्दल काय माहिती गळाला लागली हे गुलदस्त्यातच आहे.दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर कुंभरे यांच्या खुनाचा तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिया जनबंधू यांनी स्वत:कडे घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी मनोहर कुंभरेच्या खुन करणाऱ्या आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करुन शिक्षा देण्याची मागणी तळोधी (बाळापूर) परिसरातून होत आहे. पोलीस प्रशासन कारवाईसाठी आता काय अ‍ॅक्शन घेतात याकडे तळोधी बाळापूर परिसराती नागरिकांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)