दुर्गापूर येथे साकारणार कौशल्य विकास केंद्र

By Admin | Updated: December 27, 2015 01:21 IST2015-12-27T01:21:58+5:302015-12-27T01:21:58+5:30

राज्याचे वित्त व नियोजन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर तालुक्यातील ...

Kaushal Vikas Kendra, who is working at Durgapur | दुर्गापूर येथे साकारणार कौशल्य विकास केंद्र

दुर्गापूर येथे साकारणार कौशल्य विकास केंद्र

सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न : वेकोलिच्या माध्यमातून होणार केंद्र
चंद्रपूर : राज्याचे वित्त व नियोजन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे वेस्टर्न कोलफिल्डस लिमि.च्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. २७ डिसेंबरला या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार असून दुर्गापूर उपक्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी हे कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीमुळे नागरिकांना सहन करावे लागणारे प्रदूषण लक्षात घेता सामाजिक दायित्त्व म्हणून दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन केले जात आहे. या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षित करण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वेकोलिच्या स्तरावर सातत्याने रेटली आहे. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी वित्तमंत्री सुुधीर मुनगंटीवार आणि वेकोलिचे अध्यक्ष प्रबंधक निदेशक मिश्रा यांच्या झालेल्या बैठकीत दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कौशल्य विकास केंद्रात प्रारंभी अन्य प्रक्रिया व साठवण, वातानुकूलीकरण, महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण, यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून पुढील काळात रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी तसेच पुढाकाराने मंजूर सदर कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Kaushal Vikas Kendra, who is working at Durgapur