शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगी बाबांची जयंती आनंदवनात

By admin | Updated: December 28, 2016 02:02 IST

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या २६ डिसेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त आनंदवनातील श्रद्धावन येथील समाधी

वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांच्या २६ डिसेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त आनंदवनातील श्रद्धावन येथील समाधी स्थळावर आबालवृद्धांनी जावून समाधीचे दर्शन घेतले. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जन्मदिनी आनंदवनात श्रद्धावन परिसरात झालेल्या कार्यक्रमात महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त डॉ. शितल आमटे- करजगी यांनी आनंदवनातील बंधू-भगीनी, युवक- युवती यांनी बँकेत खाती काढावी व एटीएमचा वापर प्रत्येक वेळी करुन आनंदवन स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे, याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी गौतम करजगी, आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, कविश्वर, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आनंदवनातील कार्यकर्ते, तसेच कर्मयोगी बाबा यांच्यावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सोमवारला आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथे कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. जोगी, रहाटे, प्रा. पुसदेकर, प्रा. श्रीराव व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)