शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जीबगाव सिंचन योजना बंद

By admin | Updated: February 19, 2015 00:43 IST

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.

सावली : सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ही योजना तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंदावस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमीन सिंचनापासून अचानक वंचित झाली आहे. सिंचनाअभावी शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.वैनगंगा नदीच्या काठावरील देवटोक देवस्थानाजवळ जीबगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाला १९७८ मध्ये सुरुवात होऊन १९८२ मध्ये योजना पूर्णत्वास आली. त्यानंतर तालुक्यातील जीबगाव, पेठगाव माल, सिर्सी यासह अन्य गावातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून दोनदा पिके घेत होते. पाण्याच्या सुविधेने भरघोस पिके येत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारायला लागले.परंतु, काही दिवसातच या योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार फडणवीस यांनी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खेचून आणला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून योजनेच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळेच योजनेत वारंवार बिघाड येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. योजनेतील बिघाडामुळे शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहून शेती करावी लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांच्या हातचे पीक जात आहे. अशातही हाती आलेल्या धानाला भाव नससल्याने कर्ज कसे फेडायचे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतपिकातून हाती आलेल्या पैशातून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा की कर्जाचे हप्ते फेडायचे, अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)