शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट पथक कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: November 2, 2015 00:58 IST

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात कृषी विभागामध्ये कार्यरत पाणलोट पथक सदस्य हे ग्रामीण भागात ...

चंद्रपूर : केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात कृषी विभागामध्ये कार्यरत पाणलोट पथक सदस्य हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या तसेच बचत गटांच्या विकासासाठी शासनाच्या योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांचे मानधन अजुनपर्यंत देण्यात आले नाही. मानधन कधी होणार या संबंधी वरिष्ठ अधिकारी काहीच सांगत नसल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. दिवाळी सण आठ ते दहा दिवसांवर येवून ठेपला असून जिल्ह्यातील ८० पाणलोट पथक कर्मचाऱ्यांचे मानधन न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.शासन एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस तसेच दिवाळी अग्रीम उपलब्ध करून देत आहे, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम करूनसुद्धा त्यांना कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे या संस्थेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प राबवीत असून या कार्यालयातर्फे सप्टेंबर महिन्याचे मानधन देण्याच्या सूचना असूनसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले नाही. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाधिकारी तसेच जिल्हा सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी लक्ष देऊन दिवाळीपूर्वी या कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)