शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नि:शब्द वातावरणात झाला डाॅ. शीतलच्या शर्वीलचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST

फोटो-०४सीपीपीएच१६ - शर्वीलचे आपल्या आई-वडिलासोबतचे संग्रहित छायाचित्र. वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्युला शुक्रवारी पाच दिवस झाले. डाॅ. ...

फोटो-०४सीपीपीएच१६ - शर्वीलचे आपल्या आई-वडिलासोबतचे संग्रहित छायाचित्र.

वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्युला शुक्रवारी पाच दिवस झाले. डाॅ. शीतलचा सहा वर्षीय मुलगा शर्वीलचा आज वाढदिवसही होता. दरवर्षी आई डाॅ. शीतल वृक्ष लागवड करून आपल्या शर्वीलचा वाढदिवस साजरा करायची. आज शर्वीलने आईच्या आठवणीत वृक्ष लावून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी आनंदवनातील वातावरण भावूक आणि नि:शब्द होते.

वृक्ष लागवड केल्यानंतर शर्वील आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे तरंगत होती. हातात जास्वंदाचे फूल घेऊन बोबड्या शब्दांत ‘मम्माऽऽ’ अशी हाक मारत त्याने आपल्या आईच्या समाधीवर ते फूल अर्पण केले. या भावूक क्षणाचे साक्षीदार त्याचे वडील गौतम करजगी, आजोबा डाॅ. विकास आमटे, आजी भारती आमटे, सुहासिनी करजगी व शिरीष करजगी यांच्यासह आनंदवनातील परिवार होता. शर्वील आईविना पोरका झालेला आहे. तो सतत आईची आठवण काढत असतो. त्याचे मन कुठल्याही गोष्टीत रमत नसल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले.

आनंदवन पूर्वपदावर येत असले तरी कोणच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. सारे काही संपल्यागत आनंदवनातील मंडळी आपापली कामे करताना दिसून आली. आनंदवनात नीरव शांतता बघायला मिळाली.