शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ शाळा व गावासाठी ठरला मैलाचा दगड

By admin | Updated: June 21, 2017 00:45 IST

१५ ते २० घरांची लोकवस्ती, सभोवताल पूर्णत: झुडपी जंगल. गावात व घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही.

परिस्थितीवर मात : रानपरसोडीच्या विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यशलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १५ ते २० घरांची लोकवस्ती, सभोवताल पूर्णत: झुडपी जंगल. गावात व घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. मात्र शाळेतील मार्गदर्शनावर त्याने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण प्राप्त करून शाळेसाठी आणि गावासाठी ‘तो’ मैलाचा दगड ठरला. नागभीडपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रानपरसोडी येथील प्रणय प्रकाश ऊईके या गरीब विद्यार्थ्यांची ही प्रगती आहे. प्रणयचे वडिल मिस्त्रीचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर आई मोलमजुरी करून कुटुंबाला मदत करते. अशाही परिस्थितीत आपल्या मुलाने शिकावे व आपले नाव मोठे करावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. प्रणय नवेगाव पांडव येथील धर्मराज कन्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. जन्मजात कुशाग्रबुद्धी असलेल्या प्रणयची भरारी शाळेच्या शिक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रणयवर लक्ष केंद्रीत केले. प्रणयने सुद्धा शिक्षकांच्या सुचनांनुसार अभ्यास केला व दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण प्राप्त केले. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे गुण जरी कमी असले तरी प्रणयने परिस्थितीशी दोन हात करत, झोपडीत राहून, कोणतीही शिकवणी न लावता केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनावर जे यश प्राप्त केले, त्या यशाला खरोखरच मोल नाही, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.रानपरसोडीचे आजवर अनेक विद्यार्थी शिकले व मोठे झाले. धर्मराज कन्य विद्यालयातूनही हजारो विद्यार्थ्यांनी आजवर परीक्षा दिली, उत्तीर्ण झाले. नोकरीलाही लागले पण प्रणयचे यश गावासाठी व शाळेसाठी मैलाचा दगड ठरले असल्याची प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका पपीता चावरे यांनी व्यक्त केली.