शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोवनी ०२ या वेकोलिच्या कोळसा खाणीत काटाघर व येथील झोपडीवजा नाममात्र चेकपोस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत ‘लोकमत’ने महिनाभरापूर्वी वृत्त प्रकाशित करून वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

ठळक मुद्देलोकमतने वर्तविले होते भाकीत : काटाघरासमोरील शेड कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पोवनी ०२ कोळसा खाणीतील अधिकाºयांच्या बेजबाबदारपणामुळे वेकोलि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असून रविवारी आलेल्या पाऊस व वादळाने काटाघरासमोरील शेड अखेर कोसळले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुन्हा एकदा वेकोलि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.४० तासांचा कालावधी उलटून गेला तरी वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वादळात कोसळलेले शेड अजूनही तसेच पडून आहे. यामुळे वेकोलिचे अधिकारी सुरक्षेविषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते.राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोवनी ०२ या वेकोलिच्या कोळसा खाणीत काटाघर व येथील झोपडीवजा नाममात्र चेकपोस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत ‘लोकमत’ने महिनाभरापूर्वी वृत्त प्रकाशित करून वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र वेकोलिच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने रविवारी आलेल्या वादळाने काटाघरासमोरील शेड कोसळले. यात वेकोलि कर्मचारी आशिष बोभाटे यांची दुचाकी दबली. यात सुदैवाने वेकोलि कर्मचारी बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविणाऱ्या वेकोलिने कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेऊ नये, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोवनी ०२ कोळसा खाणींचे सब एरिया मॅनेजर सी.पी.सिंह यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता मला या घटनेची माहिती नसून वेकोलित काटा घरासमोरील कोणतेच शेड पडले नसल्याचा उरफाटा जावईशोध या जबाबदार वेकोलि अधिकाऱ्यांनी लावल्याने कर्मचाऱ्यांप्रति हे अधिकारी किती गंभीर आहे, हे वेगळी सांगण्याची गरज नाही.वेकोलि कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाºया वेकोलिच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक