चंद्रपुरातील मानवी तस्करी प्रकरणाचा तपास सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:01:15+5:30

दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातील बालिकेचे अपहरण करुन हरियाणा राज्यात विक्री केल्याच्या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध घेणे सुरु आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सदर गुन्ह्याचा पोलीस तपास चालु असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभा तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

Investigation of human trafficking case started in Chandrapur | चंद्रपुरातील मानवी तस्करी प्रकरणाचा तपास सुरु

चंद्रपुरातील मानवी तस्करी प्रकरणाचा तपास सुरु

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांचे उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातील बालिकेचे अपहरण करुन हरियाणा राज्यात विक्री केल्याच्या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध घेणे सुरु आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सदर गुन्ह्याचा पोलीस तपास चालु असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभा तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या मूळ तारांकित प्रश्नाच्या उत्तरात गृहमंत्र्यांनी वरील माहिती दिली. दहा वर्षांबपूर्वी चंद्रपुरातील महाकाली मंदिर परिसरातून एका बालिकेचे अपहरण करुन हरियाणात तिची विक्री करण्यात आली. तिचा सात वेळा विवाह करुन दोनदा मातृत्व लादल. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मूळ प्रश्नाद्वारे आ. मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूर तालुक्यातील वायगाव मोकासा येथील शिवारातील पांदन रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली असता पांदन रस्त्याचे बांधकाम रोजगार हमीच्या वार्षिक नियोजन आराखडा सन २०२०-२१ मध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती रो.हो.यो. मंत्री सांदीपान भुमरे यांनी दिली आहे.

Web Title: Investigation of human trafficking case started in Chandrapur