शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील ८३ लाख ३५ हजारांच्या देयकांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:01 IST

सन २०१२-१३ मध्ये दिर्भ संघन सिंचन विकास कार्यक्रमातून कोल्हापुरी बंधारे आणि मामा तलाव दुरूस्तीची कामे झाली होती. ही कामे अर्धवट असल्याने शासनाचा निधी परत गेला. मात्र, जानेवारीत सत्ताबदल झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारावरील प्रेमाची परतफेड करण्यासाठी लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक बोकाडे यांना हाताशी धरून जिल्हा निधीतून कंत्राटदारांची देयके देण्याचा विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यासाठी सूचविले.

ठळक मुद्देसीईओंना डावलून सभेत ठेवले देयक : निवृत्त कार्यकारी अभियंता अडचणीत येणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेतील निधीबाबत निर्णय घेताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संमती अनिवार्य असते. मात्र, विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातील बंधारे व मामा तलाव दुरूस्तीच्या ८३ लाख ३४ हजारांची देयके अदा करण्याचा विषय तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक बोकाडे यांनी सीईओंना डावलून सर्वसाधारण सभेत ठेवल्याचे उघड झाले. त्यामुळे या देयकांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.सन २०१२-१३ मध्ये दिर्भ संघन सिंचन विकास कार्यक्रमातून कोल्हापुरी बंधारे आणि मामा तलाव दुरूस्तीची कामे झाली होती. ही कामे अर्धवट असल्याने शासनाचा निधी परत गेला. मात्र, जानेवारीत सत्ताबदल झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारावरील प्रेमाची परतफेड करण्यासाठी लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक बोकाडे यांना हाताशी धरून जिल्हा निधीतून कंत्राटदारांची देयके देण्याचा विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यासाठी सूचविले. कोणताही विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, मे महिन्यात सेवानिवृत्त झालेले कार्यकारी अभियंता बोकाडे यांनी परस्पर हा विषय सर्वसाधारण सभेत मांडल्याने आश्चर्य केले जात आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी बोकाडे यांची विभागीय चौकशी सुरु केली आहे. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाचा निधी २०१७-१८ पासून शासनाने बंद केला असताना कोल्हापुरी बंधारे दुरूस्तीचे ५२.८० लाख आणि मामा तलाव दुरूस्तीचे ३०.५४ लाख असे एकूण ८३ लाख ३४ हजारांची देयके काढण्यासाठी विरोधी गटातील एका सदस्याकडून खतपाणी मिळाले.त्यामुळे सत्ताधाºयांनीही अधिकाºयांवर दबाव टाकून हा विषय थेट सर्वसाधारण सभेत पोहोचविला. सर्वसाधारण सभेतही या विषयासंदर्भात सूचक आणि अनुमोदकांसह इतर सदस्यांनाही कल्पना नसताना १३ फेब्रुवारी २०२० रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव पारीत झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. सभेचे कामकाज पाहणारे तत्कालीन सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे यांनीही या ठरावावर स्वाक्षरी केली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हक्काचा जिल्हा निधी कंत्राटदारांना देण्याचा घाट रचण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू झाली आहे.विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातील कंत्राटदारांची देयके जिल्हा निधीतून दिली जावू शकतात. मात्र, तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक बोकाडे यांनी आपली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगी न घेताच हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्यामुळे बोकाडे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.- राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर

टॅग्स :zpजिल्हा परिषद