शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचे नियोजन सुरू

By admin | Updated: November 10, 2015 01:31 IST

‘पुनरूत्थानाकरिता संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे.

गोंडवाना विद्यापीठात चर्चासत्र : ११ ते १३ फेबु्रवारी २०१६ दरम्यान परिषदगडचिरोली : ‘पुनरूत्थानाकरिता संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या परिषदेच्या आयोजनासाठी विद्यापीठ कामाला लागले असून शनिवारी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. भारतीय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व व्ही. एन. आय. टी. नागपूर येथे ११, १२ व १३ फेब्रुवारी २०१६ रोजी ‘पुनरूत्थानाकरिता संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यामागे नेमके कोणते कारण आहे. त्याचे महत्त्व व सदर परिषद चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी पूर्वतयारी कशी करावी, याबाबतच्या चर्चासत्राचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे मुकूल कानेटकर, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, आयोजन सहसचिव डॉ. लीना गहाणे, सचिव राजेंद्र पाठक आदी उपस्थित होते. संशोधन कशासाठी, कुणासाठी, संशोधनाचा दृष्टीकोन, उद्दिष्ट्ये व पद्धती, संशोधनाचा समाज जीवनाकरिता उपयोग आदी मुद्यांना धरून चर्चासत्रामध्ये अभ्यासक, संशोधक, प्राचार्य व विविध प्राधिकरणाचे सदस्य यांच्यासोबत चर्चा झाली व मार्गदर्शन करण्यात आले. याच चर्चासत्राला १०० पेक्षा अधिक अभ्यासक, संशोधक, प्राचार्य, विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. संचालन बीसीयूडीचे संचालक डॉ. श्रीराम रोकडे तर आभार विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)