शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यास विमाशि कटिबद्ध

By admin | Updated: November 10, 2015 01:33 IST

महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी ....

सुधाकर अडबाले : गडचांदूर येथे सत्कारगडचांदूर : महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मागे राहण्याचे आवाहन विमाशिचे नवनिर्वाचित सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सत्काराला उत्तर देताना केले.कोरपना-जिवती तालुका विमाशीच्यावतीने शनिवारी सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.डॉ. अनिल चिताडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलराव थिपे, प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, धनंजय गोरे, विमाशीचे जिल्हा कार्यवाह शेंडे, ठाकरे, कोडलकर, नभिलास भगत, बावणे, धोपटे, सोनकुसरे, तुळशिराम पुंजेकर, गोखरे, पर्यवेक्षक गिरीधर बोबडे, उद्धव निखाडे, मुख्याध्यापक अशोक लोहे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा सत्कार डॉ.अनिल चिताडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन करण्यात आला.सुधाकर अडबाले यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षण क्षेत्रातील सुरू असलेला सावळागोंधळ सांगितला. दररोज नवनवीन अध्यादेश काढून शिक्षकांना वेठीस धरण्याचे कार्य शासन करीत असल्याचा आरोप करून या विरोधात शिक्षकांना न्याय देण्यासाठी विमाशि कटीबद्ध असल्याचे सांगितले. विमाशिने अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगून विमाशीला मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. अनिल चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी केंद्रीत शिक्षण धोरण शासनाने तयार करावे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक काम देऊ नये असे सांगितले. यावेळी विठ्ठलराव थिपे यांनी विमाशीच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोडलवार यांनी केले. संचालन जिवती तालुका अध्यक्ष पाचभाई यांनी केले. आभार कृष्णा बत्तुलवार यांनी मानले. कार्यक्रमाला कोरपना, जिवती तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)