शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

मागीलकाही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तसेच पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी हतलब झाला आहे. पिकांच्या वाढीकरिता पावसाची जास्त गरज असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पावसामुळेही पिकांची वाढ खुंटते, निरनिराळ्या रोग व किडींची वाढ होते.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा परिणाम : सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सतत सुरू असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. शिवाय सततच्या ढगाळ वातावरणामध्ये पाऊसही कोसळत असल्यामुळे शेतात काम करताच येत नसल्याने मशागतीवरही परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना फवारणीसाठी वेळच मिळत नसल्याने खरीप पिकांवरमागीलकाही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तसेच पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी हतलब झाला आहे. पिकांच्या वाढीकरिता पावसाची जास्त गरज असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पावसामुळेही पिकांची वाढ खुंटते, निरनिराळ्या रोग व किडींची वाढ होते. यावर्षी सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून संततधार पावसाची हजेरी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. कृषी व महसूल विभागामार्फत नुकसानाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.यंदा खरीप हंगामाची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात झाली. पावसाने सुध्दा वेळोवेळी हजेरी लावली. त्यानंतर तालुक्यात जुलैमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर ऑगस्टमहिन्यात सतत पाऊसकोसळत असल्याने आणि आकाशात ढग आच्छादित असल्यामुळे पिकांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळणे बंद झाले आहे. सध्या १५.२० दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू असल्याने खरीप पिकांतील तण वाढले आहे. त्यामुळे पेरणीपेक्षा निंदनाच्या खर्च अधिक करावा लागत आहे. खरीप पिकांची अवस्था वाईट झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती