शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाºया पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर किड रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण : उत्पादन घटणार, शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कखांबाडा : यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवारात पिके बहरु लागली. मात्र, ऐन फुलोºयाच्या अवस्थेत पिकांवर किडरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबिन पिकांची पातीगळ व बोंडगड होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाºया पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर किड रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पावसाचे सातत्य कायम असल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. आंतरमशागत व फवारणीची कामे थांबली आहेत.अती ओलावा आल्याने आता पिकही पिवळी पडायला लागले. दहा दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. पाऊसही पाठ सोडताना दिसत नाही. रिपरिप पावसामुळे फुलगळ, पाती, बोंडगळ सुरु आहे. पाऊस सुरु असल्याने कोणत्याही उपाययोजना करणे शक्य नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.सततच्या पावसाने शेतातील कामे थांबली. पिकामध्ये तणाचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे उत्पादन होणार की नाही, याची शेतकºयांना चिंता आहे. पावसाची झड सुरूच राहिली तर सोयाबिन व कपाशीचे मोठेनुकसा होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी खांबाडा परिसरातील शेतकºयांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :agricultureशेती