फुलोऱ्यातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:49+5:30

यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाºया पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर किड रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

Insect infestation on flowering crops | फुलोऱ्यातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

फुलोऱ्यातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देढगाळ वातावरण : उत्पादन घटणार, शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्क
खांबाडा : यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवारात पिके बहरु लागली. मात्र, ऐन फुलोºयाच्या अवस्थेत पिकांवर किडरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबिन पिकांची पातीगळ व बोंडगड होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.
यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाºया पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर किड रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पावसाचे सातत्य कायम असल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. आंतरमशागत व फवारणीची कामे थांबली आहेत.
अती ओलावा आल्याने आता पिकही पिवळी पडायला लागले. दहा दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. पाऊसही पाठ सोडताना दिसत नाही. रिपरिप पावसामुळे फुलगळ, पाती, बोंडगळ सुरु आहे. पाऊस सुरु असल्याने कोणत्याही उपाययोजना करणे शक्य नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.
सततच्या पावसाने शेतातील कामे थांबली. पिकामध्ये तणाचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे उत्पादन होणार की नाही, याची शेतकºयांना चिंता आहे. पावसाची झड सुरूच राहिली तर सोयाबिन व कपाशीचे मोठेनुकसा होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.
रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी खांबाडा परिसरातील शेतकºयांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: Insect infestation on flowering crops

टॅग्स :agricultureशेती