ऑनलाईन खरेदीत वाढ, छोटे व्यावसायिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:01:06+5:30

इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देतात. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.

Increase in online shopping, small business crisis | ऑनलाईन खरेदीत वाढ, छोटे व्यावसायिक संकटात

ऑनलाईन खरेदीत वाढ, छोटे व्यावसायिक संकटात

Next
ठळक मुद्देसणासुदीचा फटका : ई-कॉमर्स कंपन्यांकडून सवलतींचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून ‘ऑनलाईन शॉपिंग’ या नव्या खरेदीच्या प्रकारामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. परिणामी प्रत्यक्षात दुकानात जाऊन खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मोठ-मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांची भारतात व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडून दसरा, दिवाळीसह विविध सण व उत्सवानिमित्त ऑफर्स दिल्या जातात. या माध्यमातून कंपन्यांची कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.
ऑनलाईन खरेदीकडे कल वाढत असल्याने कपड्यांचे विक्रेते, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देतात. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.
विजयादशमीचा मुहूर्त साधत अशा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला होता. आता तर दिवाळीच्या शुभपर्वावर ग्राहकांना विविध प्रकारचे ऑफर देत असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक चिंतेत पडल्याने दिसून येत आहे.

कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ
अनेक कामगार एकाच दुकानात अथा एकाच व्यावायिकांकडे अनेक वर्षापासून नोकरी करतात. मालक आणि त्यांच्यात भावनिक नाते निर्माण झाल्याचेही बहुतांशवेळा दिसून येते. असे असले तरी अशा कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. व्यवसाय होत नसल्याने त्यांना कामावरुन कमी करण्यात येते. ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढल्याने अशा व्यावसायिकांना फटका बसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कामगार कपात केली जात आहे.

ग्राहकांना घरपोच सेवा
ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या वेबसाईट तसेच अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचत आहेत. ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक, स्मार्ट फोनचे वापरकर्ते या कंपन्यांसाठी ग्राहक आहेत.

व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण
ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या डील्स, फेस्टिव्हल ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित केले आहे. कोणताही सण-उत्सव आला की बड्या कंपन्यांतर्फे फेस्टिव्हल ऑफर जाहीर केली जाते. आकर्षक सूट मिळत असल्याने बहुतांश ग्राहकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे आहे. दिवाळीतही ऑफर्स देण्याची शक्यता असल्याने स्थानिक व्यावसायिक धास्तावले आहेत. दसरा व दिवाळीत दरवर्षी होणारी उलाढाल कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Increase in online shopping, small business crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shoppingखरेदी