कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने ७५ बेड कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:59+5:302021-05-17T04:26:59+5:30

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, ७५ आयसीयू बेड तातडीने कार्यान्वित ...

Immediately operate 75 beds for covid pediatric patients | कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने ७५ बेड कार्यान्वित करा

कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने ७५ बेड कार्यान्वित करा

Next

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, ७५ आयसीयू बेड तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

त्या अनुषंगाने स्त्री रुग्णालय येथे लहान मुलांसाठी वेगळा व स्वतंत्र ऑक्सिजनयुक्त आयसीयू बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी जिल्हास्तरावर पेडियाट्रिक टास्क फोर्स स्थापित करण्यात आले असून, या टास्क फोर्समार्फत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एसओपी, ट्रीटमेंट प्रोटोकॉल, लहान मुलांच्या उपचारासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील खासगी रूग्णालयांतसुद्धा कोविड पेडियाट्रिक (बालरुग्ण) रुग्णांकरिता उपचाराची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील एकूण तीन रूग्णालयांना कोविड पेडियाट्रिक रुग्णांच्या उपचाराकरिता स्वतंत्र मान्यता देण्यात आली आहे.

या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर सुसज्ज ठेवण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

Web Title: Immediately operate 75 beds for covid pediatric patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.