शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्षणे नसतील तर कोरोनाग्रस्ताला दहा दिवसात सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली जायची.

ठळक मुद्देदुसऱ्यांदा चाचणी करण्याची गरज नाही । कोरोना रुग्णांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रूग्णालयातून सुटी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुटी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही. आरोग्य विभागाच्या या निर्णयाचा आधार घेत चंद्रपुरातील लक्षणे नसलेल्या रुग्णांना यापूर्वी सुटी देण्यात आली.कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये दहा दिवसात कुठलीही लक्षणे नसतील तर त्याची दुसरी चाचणी न करता थेट सुटी दिली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नव्या सूचनेनुसार याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता रुग्णालयात नव्या संशियातांसाठी जागा आणि चाचणीचा वेग वाढणार आहे.भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली जायची.आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुटी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसतील तर त्याला दहा दिवसात कोणतीही चाचणी न करता सुटी देण्यात येते. सुटी दिलेला रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त असतो. त्यामुळे लोकांनी सुटी झालेल्या रुग्णांना घाबरू नये. मात्र समाजात वावरताना सामाजिक अंतर पाळावे, जंतुनाशकाने हात धुवावे.-डॉ. कुणाल खेमनार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.सुटी झालेल्या रुग्णाकडून धोका नाहीरुग्णालयातून सुटी झालेला व्यक्ती दुसºयाला बाधित करू शकत नाही. मात्र, एखाद्या रुग्णाची प्रकृती स्थिर नसेल तर, त्याला सुटी द्यायची की नाही, याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी घेणार आहेत. लक्षणे गंभीर असतील तर अशा रुग्णाला कितीही कालावधीपर्यंत म्हणजेच तो पूर्णपणे बरा होईपर्यंत रुग्णालयात ठेवले जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या