शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करीत अडकला भाजपा नगरसेविकेचा पती

By admin | Updated: May 6, 2015 01:23 IST

चंद्रपूर येथील भाजपाच्या नगरसेविका स्वरूपा असराणी यांचा पती गणेश लिलाराम असराणी याला मंगळवारी दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली.

वरोरा : चंद्रपूर येथील भाजपाच्या नगरसेविका स्वरूपा असराणी यांचा पती गणेश लिलाराम असराणी याला मंगळवारी दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याजवळून २६ हजार रुपयांची विदेशी दारू व तस्करीसाठी वापरण्यात आलेली रुग्णवाहिका (एमएच-३३ जी-६७५) जप्त केली आहे. ही कारवाई वरोराचे ठाणेदार मल्लिकार्जून इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लांजेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर मार्गावरील खांबाडा येथे उभारण्यात आलेल्या चौकीतील पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश असराणी हा रुग्णवाहिका घेऊन नागपूर मार्गाने वरोऱ्याकडे येत असताना खांबाडा येथे पोलिसांनी रुग्णवाहिका अडविली. तपासणी केली असता, त्या रुग्णवाहिकेत २६ हजार रुपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी लगेच गणेश असराणी याला अटक केली आहे. तो चंद्रपूर येथील सिव्हील लाईन वॉर्डाच्या भाजपाच्या नगरसेविका स्वरुपा असराणी यांचा पती आहे. चंद्रपुरातील रामनगर परिसरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेला गणेश असराणी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात उतरला, असे सांगितले जाते. (प्रतिनिधी)