शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

किती ही लूट? गंजवॉर्डात कांदा २५ रुपये, तर घराजवळ ३५ रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असते. चंद्रपुरातील गंजवॉर्ड येथे विक्रेत्यासह परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. त्यामुळे येथील ...

भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असते. चंद्रपुरातील गंजवॉर्ड येथे विक्रेत्यासह परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. त्यामुळे येथील दर हे नियंत्रणात असतात. तसेच गंजवाॅर्डात दररोज बाजार भरत असल्याने अनेकजण सकाळच्या वेळेस येथे गर्दी करीत असतात. गंजवॅार्ड येथे कांदे २५ रुपये, टमाटर २५ रुपये किलोने विक्री केले जात आहे. परंतु, हातठेलेवाले कांदे ३० ते ३५ रुपये तर टमाटर ३० ते ४० रुपये दराने विक्री करीत आहेत.

-------

बॉक्स

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा २५ रुपये तर रामनगर चौकात ३५ रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठोक दराने भाजीपाल्याची विक्री केली जाते. अनेक व्यापारी येथेच किरकोळ विक्रीसाठी बसतात. येथे काद्यांची विक्री व टमाटरची विक्री २५ रुपये किलो तर रामनगर येथे ३५ ते ४० रुपये दराने विक्री केली जात आहे.

बॉक्स

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात!

व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन तो विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र ज्या दराने तो भाजीपाला शहरांमध्ये विकला जातो. त्यातील पैसे शेतकऱ्यांच्या वाट्याला कमी व दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वाट्याला जास्त जातात. यामुळे अनेकदा शेतकरी थेट आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी स्वत: घेऊन येऊन विक्री करताना दिसून येतात.

----

अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!

गंजवॉर्डात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला स्वस्त मिळतो. याबाबाबत माहिती आहे. परंतु, तेथे पाव, दीडपाव भाजीपाला दिला जात नाही. तसेच घरापासून दूर असल्याने जाणेही परवडत नाही. त्यामुळे घरपोच येणाऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला जातो.

-प्रतिभा कोडापे, गृहिणी

------

घरापासून गंजवार्ड दूर येतो. त्यामुळे काही कामानिमित्त त्या परिसरात जाणे झाले तरच तेथून भाजीपाल्याची खरेदी करते. नाहीतर घराकडे येणाऱ्या हातठेल्यावाल्याकडून भाजीपाला खरेदी करतो. गंजवॉर्डपेक्षा घरपोच मिळणारा भाजीपाला महाग असतो.

-रंजना खडसे, गृहिणी

-----

एवढा फरक कसा

कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच गंजवॉर्डात शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. व्यापारी खरेदी करून विक्री करतात. त्यामुळे थोड्या कमी दरात भाजीपाला मिळत असतो.

-राजू रायपुरे विक्रेते

------

गंजवॉर्डात थेट शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी असतो. याऊलट हातठेल्यावर विक्री विकणारे कृषी उत्पन्न बाजार समिती तेथून भाजीपाला खरेदी करून त्यात स्वत:चा मुनाफा व मेहनत काढून विक्री करीत असल्याने काही प्रमाणात महाग असतात.

संजय गेडाम, विक्रेते

-----

कांदा २५ ३५

टमाटर ३० ४०

आलू २० ३०

वांगे ३० ४०

कारले ३० ४०

भेंडी ३० ४०

लसून १०० १५०

फुलकोबी ४० ६०