शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

सागवानाच्या कत्तलीबाबत वन अधिकारी अनभिज्ञ कसे ?

By admin | Updated: June 9, 2014 23:32 IST

मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर अंतर्गत झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुरेश रंगारी - कोठारीमध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर अंतर्गत झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे वनाधिकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवित असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महामंडळाच्या ३२ हजार हेक्टर वनक्षेत्रात एकूण ३३ बिट असून त्यातील १५ ते २0 बिटात चोरट्यांनी धूमाकुळ घातला आहे. लाखो रुपये किंमतीच्या सागवान वृक्षांची कत्तली करण्यात आली आहे. प्रस्तुत  प्रतिनिधीने झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १, २, ८0, ८१, ८२ क्षेत्राचा फेरफटका मारला असता, विदारक चित्र समोर आले. २0 ते २५ वर्षांच्या सागवान रोपवनात जागोजागो मोठमोठय़ा सागवान वृक्षांची कुर्‍हाडीने, करवतीने कटाई केली आहे. जंगलातच ठिय्या मांडून हाताने कटाई केल्याचे अनेक पुराने ‘लोकमत’ला प्राप्त झाले आहेत. साग वृक्षांची कटाई करून त्याचे वेगवेगळे तुकडे करण्यात आल्याचे तसेच हातकटाई करण्याकरीता लाल रंगाच्या धाग्याने मार्कींग केल्याचे दिसून आले. झरण वनक्षेत्रातील पाच कक्षात २00 ते ३00 साग वृक्षांची कत्तल झाली आहे. असाच प्रकार तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात आहे. या चारही वनक्षेत्रातील बिटाची खास  यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. त्यातून खरा प्रकार उघडकीस येईल. यामुळे जंगलाचे संवर्धन व संरक्षणाच्या बाता करणार्‍या वनविकास महामंडळातील अधिकार्‍यांच्या कर्तव्यदक्षतेचा बुरखा फाडला जाणार आहे. शासनाच्या जंगलाचे महामंडळाचे अधिकारी खरोखरच संरक्षण करण्यास तत्पर आहेत काय? याचा लेखाजोखा प्रत्यक्षात दिसून येईल. वनाचा विकास करण्याच्या नावाखाली दरवर्षी रोपवन घेण्यात येतात. त्यासाठी उभ्या जंगलाची कत्तल महामंडळाकडून करण्यात येते. या कामात अधिकारी व्यस्त असतात. यात लाखोंची माया जमवून वरिष्ठांना मलिदा वाटला जातो. परिणामी जंगल संरक्षणाकडे त्यांचे लक्ष नसते. जंगलात दिवस-रात्रं चोरट्यांचा वावर असतो. जंगलात हातकटाईचे ठिय्ये असतात.