शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कशी टळणार ‘ईडा-पिडा’, कधी येणार बळीचे ‘राज्य’

By admin | Updated: November 13, 2015 01:07 IST

देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, असे म्हटले जाते. मात्र ज्याच्या जिवावर देशाची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे, त्या बळीराजाची आर्थिक...

शेतकरी संकटाच्या खाईत : कापसासह, सोयाबीनचे भाव पडलेखडसंगी : देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, असे म्हटले जाते. मात्र ज्याच्या जिवावर देशाची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे, त्या बळीराजाची आर्थिक व्यवस्था मात्र खालावली असून, शेतात सोनं पिकवणाऱ्या बळीराजाच्या नशीबी मात्र संघर्षाचं जगणंच असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ‘ईडा-पीडा टळो अन् बळींचे राज्य येवो’ ही पुरोगामी महाराष्ट्रातील हाक कधी ऐकली जाणार आणि कधी बळीचे राज्य येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.राज्यात पश्चिम महाराष्ट्र खांदेश या भागापेक्षा विदर्भ सिंचन व्यवस्थेसह इतरही वर्गात माघारला आहे. विदर्भातील काही भागात कापूस, सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते. कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाते. हे दोन्ही पीक ऐनं दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्याच्या घरात येतात. त्यामुळे शेतकरी आपली दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कापसाला व सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळावा यासाठी अनेक वर्षापासून शेतकरी शासन दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून रेटा सुरू आहे. देशात, राज्यात आघाडीचे सरकार असताना शेवटच्या वर्षात कापसाला पाच हजार तर सोयाबीनला तीन हजार भाव देण्यात आला. यासाठी विरोधी पक्ष भाजपा, सेना यांनी अनेक आंदोलने केलीत. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात समाधानी होता. मागील वर्षी देशात व राज्यात सत्तापरिवर्तन होवून भाजपा-सेनेचे सरकार आले. सरकार येवून एक वर्ष लोटले. त्याच्याही कार्यकाळात कापसाला, सोयाबीनला भाव कमी आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा हितचिंतक कोण, हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा ठाकला आहे. वाढती महागाई, नापिकी शेतमालाला भाव या सर्व बाबीला कंटाळून शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करीत आहेत. मात्र राजकीय पुढारी शेतकऱ्याविषयी फक्त राजकारण करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी प्रधान असलेल्या देशातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेला बळीराजा दोन वेळच्या जेवणासाठी महाग होत असल्याने व कर्जाच्या ओझाखाली दबत गेल्याने अनेक शेतकरी उदासीन होवून आपले जीवन संपवित आहेत. या घटना राजकीय पुढारी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपाय शोधण्याच्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्यास हात वर करण्यात येत आहेत. त्यामुळे दिवसेदिवस वृद्धा अवस्थेकडे झुकत चाललेल्या या शेती व्यवसायाच्या समस्याकडे सरकारने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तरच हा व्यवसाय महागाईशी सामना करताना तग धरून राहील. अन्यथा हा व्यवसाय मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित. शेतकऱ्याच्या समस्येविषयी राजकीय पुढारी तथा संघटनाही काही करायला तयार नाहीत. दाद मागायची तर कुणाकडे हा एक प्रश्नच आहे. (वार्ताहर)