शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या लग्नात दिला आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात

By admin | Updated: June 17, 2017 00:34 IST

विवाह सोहळा म्हणजे पैशाची उधळपट्टी आली. डीजे, बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई यातून वऱ्हाडी मंडळीला ताटकळत वर मंडपी येण्याची पहावी लागणारी वाट.

नवा आदर्श : लग्न वेळेवर लावल्याने वर-वधू पित्याचा सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : विवाह सोहळा म्हणजे पैशाची उधळपट्टी आली. डीजे, बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई यातून वऱ्हाडी मंडळीला ताटकळत वर मंडपी येण्याची पहावी लागणारी वाट. यामुळे लहान्यांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच त्रास सहन करवा लागत असतो. परंतु साखरी येथील काशिनाथ गोरे यांच्या अंकुश या मुलाचा विवाह सोहळा पोंभूर्णा तालुक्यातील चंपतराव ठवस यांची मुलगी शिल्पा हिच्याशी नुकताच पार पडला. हा विवाह सोहळा अगदी वेळेवर लावला. तसेच नवेगाव येथील घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असलेल्या आदिवासी बंडू सलामे या मुलाला अकरा हजार रुपये देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.एरवी विवाह सोहळा असला की वर पित्यामध्ये असलेला आनंद वेगळाच असतो. त्यात तो वेळेचे भान विसरून वरातीमध्ये दंग असतात. डिजे व बँडच्या धुंदीची नशा त्यांच्या डोक्यात असतात. त्यामुळे वेळेचे भान विसरून तोही तरुणाईमध्ये थिरकताना दिसून येते. परंतु समाजात अशी फार कमी मंडळी आहे की ते वेळेचे भान ठेवून सोहळ्याप्रसंगी येणाऱ्या मंडळींना त्याचा त्रास होऊ नये म्हणून लग्न सोहळा वेळेवर पार पाडत असतो. हे येथील काशिनाथ गोरे यांनी दाखवून दिले. याप्रसंगी उपस्थित असलेले राजुऱ्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी लग्न सोहळा वेळेवर लावल्याने वर पित्याचे व वधु पित्याचे शाल व पुष्पगुच्छ देवन सत्कार केला. यावेळी विलासराव बोंगीवार माजी नगराध्यक्ष राजुरा, बाबुराव मडावी, केशवराव ठाकरे यांची उपस्थिती होती.घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ असलेला नवेगाव येथील बंडू सलामे या आदिवासी समाजातील युवकाला वराचे पिता काशिनाथ गोरे यांनी विवाह सोहळ्यात आणून त्याला माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यांच्या या समाजपयोगी कार्याचे विवाहाला जमलेल्या मंडळींसह सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा आदर्श समाजातील इतर मंडळींनी घेतल्यास गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता मदत होणार असल्याचे सर्वत्र बोलल्याही जात होते.