कृषी सहायकांचे विविध मागण्यांसाठी आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST2017-07-20T00:46:25+5:302017-07-20T00:46:25+5:30

आपल्या विविध मागण्या संदर्भात मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यक संघटनेने काम बंद आदोलन सुरू केले.

To help the farmers in various demands | कृषी सहायकांचे विविध मागण्यांसाठी आमदारांना साकडे

कृषी सहायकांचे विविध मागण्यांसाठी आमदारांना साकडे

मागण्यांची पूर्तता करा : कामबंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांची कामे प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : आपल्या विविध मागण्या संदर्भात मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यक संघटनेने काम बंद आदोलन सुरू केले. या मागण्यासंदर्भात कृषी संघटनेने वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर याची भेट घेतली. तसेच त्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.
नवीन स्थापन झालेल्या मृदा व जलसंधारन विभागाकडे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग होण्यापुर्वी आकृतीबंध तयार करून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदोन्नती कृषी सहाय्यकामधुन करण्यात यावी, कृषी सहाय्यक यांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन कृषी सहाय्यक संघटनेने मागील १२ जूनपासून आंदोलन सुरू केले.
त्याची दखल घेतली नसल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कृषी सहाय्यक संघटनेच्या शिष्ट मंडळाने आम बाळू धानोरकर यांची भेट घेतली. तसेच त्याला आपल्या मागण्याचे निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाने आ. बाळू धानोरकर यांच्यासोबतच आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. आ. धानोरकर यांनाही याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही शिष्टमंडळाशी बोलताना दिली.

विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार
कृषी सहाय्यक संघटनेच्या मांगण्या रास्त असून त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व राज्याच्या कृषी मंत्र्यांना तातडीने निवेदन पाठविले आहे. यावर तोडगा निघाला नाही, तर येत्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. धानोरकर यांनी संघटनेला दिले.

Web Title: To help the farmers in various demands