शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पावसाने चंद्रपुरातील अनेक नाल्यांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

चंद्रपूर महानगर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वार्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता केली. ज्या वार्डातील नाल्यांना बरेच वर्ष तेथे नव्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडणारे बहुतांश पाईपलाईन दुरूस्त करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च झाला. वर्दळीच्या मुख्य मार्गासोबत शहरातल्या सर्वच प्रभागांमध्ये नाल्यांचा उपसा करण्यात आला.

ठळक मुद्देजागोजागी नाल्या चोकप : पाणी रस्त्यावर, नागरिकांची त्रेधातिरपीट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील सर्वच वार्डातील नाल्यांची स्वच्छता केली. कामगार आणि जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांचाही उपसा करण्यात आला. मात्र, आधीच्याच त्रुटी जैसे थे ठेवल्याने मंगळवारी सायंकाळी झालेल्या धुवांधार पावसाने बहुतांश नाल्यांची पोलखोल झाली. वाहनधारकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी मोठी दमछाक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.चंद्रपूर महानगर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वार्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता केली. ज्या वार्डातील नाल्यांना बरेच वर्ष तेथे नव्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडणारे बहुतांश पाईपलाईन दुरूस्त करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च झाला. वर्दळीच्या मुख्य मार्गासोबत शहरातल्या सर्वच प्रभागांमध्ये नाल्यांचा उपसा करण्यात आला. बांधकामाच्या कंत्राटावरून महानगर पालिकेच्या सभेत मोठा गदारोळही उठला होता.कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाने या कामांकडे विशेष लक्ष दिल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर नाल्यांमधून पाणी बाहेर निघणार की नाही याची चाचणी करण्यात आली. मुसळधार पाऊस पडल्यानंतरच खरे चित्र पुढे येणार होते.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने झोडपल्याने मुख्य मार्गाला जोडणाऱ्या बहुतांश नाल्या चोकअप झाल्या. पावसाचे पाणी नालीतून पुढे न गेल्याने रस्त्यावर आले. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच केलेल्या स्वच्छतेवर चंद्रपूर शहरातील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.नाल्यांची करावी तपासणीमनपाने नालीची स्वच्छता करण्यासोबतच अनेक ठिकाणी लहान पुल बांधले. परंतु, यातून पाणी बाहेर निघेल की नाही, याची खात्री केली नाही. त्यामुळे नालीतील पाणी साचून आहे तर कुठे रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र आहे. नव्याने बांधकाम केलेल्या सर्व नाल्यांची तपासणी करण्याची मागणी चंद्रपूर शहरातील नागरिकांनी केली आहे.चुकीच्या नियोजनाचा फटकाआझाद गार्डनजवळ सांडपाण्याचे पाईपलाईन फुटले आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मनपाकडून एक आठवड्यापासून पाईपलाईन दुरूस्तीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या पाण्यामुळे वाहने घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. सांडपाणी वाहत असल्याने प्रशासनाने मंगळवारपासून जटपुरा गेटकडे जाणाऱ्या वाहनांना आझाद गार्डन परिसरातून वळविण्याचा निर्णय घेतला.बहुतांश वार्डात नाल्यातील पाणी रस्त्यावरशहरातील सर्वच वार्डांतील नाल्यांचा उपसा झाला आहे. मात्र ही कामे पूर्ण करताना प्रशासनाकडून अनेक चुका झाल्या. त्यामुळे पावसाचे पाणी नालीतून बाहेर निघण्याचे मार्ग बंद झाले. विठ्ठल मंदिर, बालाजी वार्ड, सिस्टर कॉलनी, पठाणपुरा वार्ड, नगीना बाग, गंजवार्ड, अंचलेश्वर वार्ड, तुकूम, बंगाली कम्प व इंदिरानगर परिसरातील नालीतील पाणी थेट रस्त्यावर आल्याचे दिसून आले.

टॅग्स :Rainपाऊस