शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारासह आरोग्य पथकाला गावाच्या सीमेवर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गावात गेले असता येथील गावकऱ्यांनी आम्हाला काहीच झाले नाही, आमची तपासणी करू नका, असे म्हणून या पथकाला गावातून हाकलून लावले.

ठळक मुद्देलाठीकाठी घेऊन ग्रामस्थांचा विरोध : गावात तपासणी शिबिर राबवू नका

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : आमच्या गावात कोरोना या रोगाच्या लक्षणाची तपासणी करू नका, असा नारा देत संपूर्ण मानोरा गावातील नागरिक लाठयाकाठया घेऊन गावसीमेवर आले. गावात आलेल्या तहसीलदारासह आरोग्य पथकाच्या समोर उभे होऊन त्यांना सीमेवरच रोखले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला.पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गावात गेले असता येथील गावकऱ्यांनी आम्हाला काहीच झाले नाही, आमची तपासणी करू नका, असे म्हणून या पथकाला गावातून हाकलून लावले.याबाबतची माहिती तहसीलदार महेश शितोळे व तालुका आरोग्य अधिकारी संजय असूटकर यांना मिळताच ते आरोग्य विभागाच्या पथकासह शनिवारी मानोरा या गावी गेले. त्यांनी नागरिकांमध्ये असणाºया अफवा दूर करण्याचा प्रयत्न करून तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.परंतु त्या ठिकाणी एकाच वेळी संपूर्ण गाव एकत्र जमा होऊन हातात लाठीकाठी घेऊन उभे झाले व गावकऱ्यांनी एक एक करीत आम्हाला काहीच झाले नाही.आम्हीच आपली काळजी घेऊ, असे म्हणत या आरोग्य पथकाच्या समोर उभे होऊन गावात येण्यात बंदी घातली. वारंवार विनंती करून गावकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसून रोष वाढत असल्याचे पाहून आरोग्य पथक आल्या पावली परत गेले. मात्र या प्रकारामुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. प्रशासनही तणावात होते.पहिल्यांदा गेलेल्या पथकाला परत पाठविले. त्यामुळे मी स्वत: आरोग्य विभागाच्या टीमसोबत गेलो. परंतु मानोरा येथील गावकरी आमचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.तरीसुद्धा पुन्हा एकदा गावकºयांची समजूत घालून तपासणी शिबिर राबविणार आहोत.-महेश शितोळे, तहसीलदार, भद्रावती.

टॅग्स :TahasildarतहसीलदारCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या