शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

क्वारन्टाईन लोकांचेच आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पुणे, मुंबई सोडून जिवती तालुक्यात परत आले. चार ते पाच दिवसांपासून आलेल्या या लोकांना शासकीय आश्रमशाळा जिवती येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अनेक खोल्या असतानाही एकाच ठिकाणी अनेक व्यक्ती

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यातील कुंभेझरी, दमपूर मोहदा, शेणगाव, धोंडाअर्जुनी, पांढरवणी या खेडेगावातील ७१ नागरिक हे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक येथून आले असून त्यांना जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत क्वारन्टाईन केले आहे. मात्र त्यांच्याकडे तालुका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या लोकांचेच आरोग्य आता धोक्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पुणे, मुंबई सोडून जिवती तालुक्यात परत आले. चार ते पाच दिवसांपासून आलेल्या या लोकांना शासकीय आश्रमशाळा जिवती येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे. परंतु कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोरोना हा आजार संसर्गजन्य असला तरी आणि आश्रमशाळेत अनेक खोल्या असल्या तरी अनेक व्यक्तींना वेगवेगळे न ठेवता एकत्र ठेवण्यात आले आहे. क्वारन्टाईन ठेवलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून जेवण दिले जायला पाहिजे. परंतु त्यांच्या घरून जेवणाचा डबा आणून दिला जात आहे. यामुळे इतरांचेही आरोग्य बाधित होण्याची भीती आहे. सर्व वस्तू घरून आणि घरातील कुटुंबांशी संपर्क येत असल्याने क्वारन्टाईन करण्याचा हेतूच दूर लोटला जात आहे. तेथील व्यक्तींना सॅनिटायझर, साबू पुरविले जात नाही.७१ पैकी २८ लोकांची तपासणीजिवती येथील शासकीय आश्रमशाळेत ७१ नागरिकांना क्वारन्टाईन ठेवण्यात आले असून यापैकी २८ नागरिकांना चंद्रपूर येथे तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाठविले. उर्वरित नागरिकांची अजूनही तपासणी करण्यात आलेली नाही. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांचा अहवाल यायचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या