कुड्याच्या फूलातून त्यांनी शोधला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:56+5:30

विदर्भात झुडपी जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या जंगलात कुडा वनस्पतीला पोषण वातावरण आहे. साधारणत: ५ फुटांपासून २० फुटांपर्यंत या झाडांची वाढ होत असून उन्हाळ्याच्या प्रारंभापासून या झाडांना फुले येतात. नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या नवखळा या गावालगत जंगल आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी कुड्याच्या फुलांनाच आपले उदरनावार्हाचे साधन केले आहे.

He found employment in the flower of Kuda | कुड्याच्या फूलातून त्यांनी शोधला रोजगार

कुड्याच्या फूलातून त्यांनी शोधला रोजगार

googlenewsNext

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : रानमेव्यात गणना होणारे कुड्याचे फूल सध्या मजुरांच्या रोजगाराचे साधन बनले आहे. नागभीडलगतच्या नवखळा येथील ५० च्या वर नागरिक आपला उदरनिर्वाह या फुल विक्रीतून करीत आहेत. उन्हाळ्यात ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांपासून बनविलेल्या भाजीला अनेकांची पसंती असते.
विदर्भात झुडपी जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या जंगलात कुडा वनस्पतीला पोषण वातावरण आहे. साधारणत: ५ फुटांपासून २० फुटांपर्यंत या झाडांची वाढ होत असून उन्हाळ्याच्या प्रारंभापासून या झाडांना फुले येतात. नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या नवखळा या गावालगत जंगल आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी कुड्याच्या फुलांनाच आपले उदरनावार्हाचे साधन केले आहे. अगदी पहाटेच हे नागरिक जंगलाच्या दिशेने निघतात. उन्ह होईपर्यंत म्हणजेच, दुपारी १२ वाजेपर्यंत ते या फुलांची तोडणी करतात. त्यानंतर दुपारनंतर नागभीड शहरात ही फुले विक्रीसाठी आणल्या जाते. नवखळा येथील किमान ५० जण सदर फल विक्रीचे काम करतात. यावर्षी कोरोनामुळे लाँकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या विक्रेत्यांवरही मर्यादा आल्या आहेत. दरवर्षी हा व्यवसाय करणारे काहीजण मूल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी येथील बाजारांमध्ये जाऊन फूलविक्री करीत होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाची साधने बंद असल्याने त्यांना बाहेर जाता येत नाही. सर्व फुले नागभीड येथेच विकावी लागत आहेत. परिणामी विक्रेत्यांची संख्या जास्त झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत त्यांची निम्मीच कमाई होत आहे.
यावर्षी अधूनमधून पाऊस पडत असल्याने कुड्याच्या झाडांना फुले चांगली येत आहेत व जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही फुले येत राहतील,असा अंदाज या नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

इतर गावातही फूलविक्री
तालुक्याच्या जंगलव्याप्त प्रत्येक गावातील किमान पाच-दहा जण कुड्याच्या झाडांची दोन महिने फूलविक्री करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

पोळ्याला शेंगांचे जेवण
पोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे. शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलांची या दिवशी पुजा केली जाते. या दिवशी बैलांच्या जेवणात कुड्याच्या शेंगांच्या भाजीचा वा पानांपासून बनविलेल्या पत्रावळीचा समावेश असतो.

Web Title: He found employment in the flower of Kuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.