शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कापणीला आलेले सोयाबीन अंकुरले

By admin | Updated: October 3, 2016 00:45 IST

गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने ...

पावसाचा परिणाम : हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया जाणारगोवरी : गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या कापणीचा काळ आहे. पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापणी केली नाही. सोयाबीनची कापणी केली तर पावसामुळे सोयाबीन सडून खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कापणी करण्याचे टाळले आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे सोयाबिन कापणीला आहे. पावसामुळे सोयाबीनची कापणी खोळंबली आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या महाबीज सोयाबीनला त्याचा मोठा फटका बसला आहे. इतर कंपनीच्या सोयाबीनपेक्षा महामंडळाचे महाबीज सोयाबीन कापणीला लवकर झाल्याने पावसामुळे सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनचे कापणी करुन ढिग करुन ठेवले आहे. मात्र पाच- सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सोयाबीनचे पीक खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजले आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे. यावर्षी सोयाबीन पिकांना चांगले दिवस येईल, असे वाटत असतानाच अवकाळी आलेल्या पावसाने सोयाबीनचा घात केला आहे. सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना बळकटी देत असतात. हे पीक कमी कालावधीचे असल्याने शेतकरी यातून वर्षभराचा खर्च करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेला आर्थिक ताण कमी होतो. परंतु यावेळी आलेली परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता होती. मात्र हाच पडणारा पाऊस सोयाबीन पिकांसाठी घातक ठरेल, असा विचारही शेतकऱ्यांच्या मनाला कधी शिवला नसेल. पावसामुळे बहुतांश शेतातील सोयाबीन अंकुरले असल्याने शेतकरी पुन्हा काकुळतिला आला आहे. (वार्ताहर)पावसाने केला सोयाबीनचा घातगेल्या पाच- सहा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. हा पाऊस सर्व पिकांसाठी चांगला असला तरी सोयाबीन पिकासाठी घातक आहे. सोयाबीन सध्या कापणीवर आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर जिवाचे रान करुन शेतकऱ्यांनी उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होणार आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकांना कोंब अंकुरले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक सडून खराब होत असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. - रामदास देवाळकर, शेतकरी गोवरी,