हरीश ससनकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

By Admin | Updated: October 10, 2016 00:41 IST2016-10-10T00:41:29+5:302016-10-10T00:41:29+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते हरीश चंद्रभान ससनकर...

Harish Sasankar received state honor teacher award | हरीश ससनकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

हरीश ससनकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते हरीश चंद्रभान ससनकर यांना सन २०१५-१६ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबरला जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शनिवारी एनसीपीए हॉल नरिमन पार्इंट मुंबई येथे प्रदान करण्यात आला. 
हरीश ससनकर यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले असून सामाजिक कार्यातही मोलाची कामगिरी बजावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Harish Sasankar received state honor teacher award