शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दहशत अन् संघर्षाचा सुखद अंत

By admin | Updated: July 12, 2017 00:39 IST

वाघ हा केवळ शब्दच तोंडातून काढला तरी भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथे याच वाघाने ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा-सात गावात अक्षरश: धुमाकूळ घातला.

अखेर नरभक्षक वाघीण पिजराबंदग्रामस्थांमध्ये आनंद   वाघिणीला बघायला उसळली गर्दीरवी रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वाघ हा केवळ शब्दच तोंडातून काढला तरी भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथे याच वाघाने ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा-सात गावात अक्षरश: धुमाकूळ घातला. एक महिन्याहून अधिक दिवस या गावांमधील गावकरी प्रचंड दहशतीत होते. पाच जणांचा बळी गेला. अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पडला. त्यामुळे आधी या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचा व नंतर जेरबंद करण्याचा निर्णय झाला. वनविभागाची चमू, शार्प शूटर, पोलीस दल व ग्रामस्थांनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी जंगल पिंजून काढला. तब्बल एक महिन्याच्या या संघर्षानंतर नरभक्षक वाघिणीला पिजराबंद करण्यात आले आणि गावकऱ्यांची दहशत व वनविभागाच्या संघर्षाचा सुखद अंत झाला. सोमवारी नरभक्षक वाघिणीला पकडण्यात यश आले आणि सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. परंतु मागील काही महिन्यांपासून या वाघिणीने कसा तांडव घातला व त्यानंतर ज्या घडामोडी घडत गेल्या, ते हा परिसर व जिल्ह्यातील नागरिक कधीच विसरू शकणार नाही.ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा, बोळधा, पद्मापूर (भूज), कुडेसावली, बल्लारपूर (माल), एकारा आदी भागात या वाघिणीने गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेकांची झोपमोड केली होती. कुणाला जिवानिशी ठार केले तर कुणाला जखमी केले होते. २८ मार्चला कुडेसावली येथील सोनुजी दडमल यांना जखमी केले होते. १२ जूनला मंगला ईश्वर आवारी या हळदा येथील महिलेस जखमी केले होते. तर १४ जूनला हळदा येथील यशवंत बापूजी चिमूरकर या गुराख्यावर हल्ला करुन जखमी केले होते. १७ जूनला बोडधा येथील क्षीरसागर गजानन ठाकरे या महिलेला ठार केले. २२ जूनला पद्मापूर येथील शौचास गेलेल्या मधुकर टेकाम यास वाघिणीने चक्क फरकटत नेऊन ठार केले होते. वारंवार घडलेल्या घटनेने १६ जूनला हळदावासीयांनी, लहान बालकांपासून म्हाताऱ्यापर्यंत, अशा सर्वांनी मिळून ब्रह्मपुरी- एकारा रोडवर रस्ता रोको आंदोलन केले होते. दुपारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सायंकाळी वेगळेच वळण घेतले होते. वनविभाग व पोलिसांवर गोटमार झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करुन जमावाला पांगवावे लागले होते. त्यात दोन पुरुष व एक महिला जखमी झाले होते. वाघाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या रस्ता रोको आंदोलाला उग्र रुप धारण होऊन ४९ लोकांना अटक झाली होती. त्यानंतर वाघाने पदमापूर येथे पुन्हा मधुकर टेकाम यांचा बळी घेतल्याने तणाव आणखी वाढला होता. वाघिणीच्या दहशतीमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला होता. प्रकरण गंभीर झाल्याने २३ जूनला विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी रेटून धरली. वाघिणीला मारण्याचे आदेश येईपर्यंत आपण येथेच ठाण मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.अखेर आमदार वडेट्टीवार यांच्या या आंदोलनाला यश आले. त्याच दिवशी रात्री वाघाला मारण्याचा आदेश निर्गमित झाला. त्यानुसार २४ जूनला पोलीस विभागाचे पाच शॉर्पशुटर पदमापूर भूज परिसरात दाखल झाले आणि वाघिणीची शोध मोहीम सुरू झाली. चार दिवस वनविभागाच्या पथकाने परिसर पिंजून काढला. मात्र नरभक्षक वाघीण शुटरच्या जाळ्यात आली नाही.एक-एक दिवस मावळत असतानाही वाघीण सापडत नसल्याने गावकऱ्यांच्या मनातील धडकीही वाढत जाऊ लागली. अखेर २८ जूनला नेमबाजीतील वाघ समजल्या जाणाऱ्या हैदराबाद येथील राष्ट्रीय मानांकन प्राप्त शार्पशुटर नवाब शाफत अली खान यांना पाचारण करण्यात आले व दुसऱ्या दिवशी २९ जूनला नागपूर खंडपिठाने वाघाला मारण्याचे आदेश रद्द करुन बेशुद्ध करण्यात यावे, असा आदेश दिला. त्यानुसार पाच शॉर्पशुटर व हैदराबाद येथील नवाब शाफत अली, व्याघ्र संरक्षण दल, वनविभागाचे कर्मचारी व मजूर असा शेकडोंचा ताफा जंगल परिसरात दाखल झाला. परिसरातील सहा-सात गावांना लागून असलेल्या जंगलात त्यांनी शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहिमेलाही १५ दिवस लोटले तरी नरभक्षक वाघीण या पथकाला हुलकावणी देत राहिली.अशी अडकली वाघीण पिंजऱ्यातहळदा येथील वल्कीदेव शेतशिवारात रविवारी या वाघिणीने गायीची शिकार केली. सोमवारी ती गाईला घेऊन जाण्यासाठी येणार म्हणून नरभक्षक वाघीण तीच आहे किंवा नाही, याची ओळख पटविण्यासाठी नवाब शफात अली यांनी तीर साधला व वाघिणीच्या मानेवर डॉट मारण्यात ते यशस्वी झाले. १०० मीटरच्या आत ती वाघीण बेशुद्ध झाली. त्यावेळी नवाब शाफत अली खान, रेंजर काटकर, डॉ. कादू यावेळी उपस्थित होते. यावेळी बेशुद्ध असलेली वाघीण तीच आहे, याची खात्री पटल्यानंतर तिला पिंजऱ्यात जेरबंद करून एकारा येथील विश्रामगृह परिसरात नेण्यात आले. वन्यप्रेमींमध्ये आनंदपद्मापूर भूज परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला ठार मारण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल व गावांमधील स्थिती पाहता वनविभागाने वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर वन्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. ठार मारणे हा केवळ एकच उपाय नसून अन्य अनेक उपाय आहे, असे या वन्यप्रेमींचे म्हणणे होते. अखेर हा आदेश रद्द झाला आणि सोमवारी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. वाघिणीचा जीव वाचल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंद आहे आणि ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.जनजीवनावर झाला होता परिणामया नरभक्षक वाघिणीमुळे सहा-सात गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. तब्बल पाच जणांचा वाघिणीच्या हल्ल्यात जीव गेला होता. अनेक जण जखमी झाले. पाळीव प्राण्यांचाही बळी गेला होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला होता. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत होते.