शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या शिल्पकार राणी हिराईला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, आदिवासी विद्यार्थी संघाचे कंटू कोटनाके, संजू मडावी, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री मंगाम, आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देकृतज्ञता : देखणी मंदिरे, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण करण्यात योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर नगरीच्या शिल्पकार आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून देशभरातील तत्कालीन अनेक राजवटींमध्ये स्वत:च्या लक्षवेधी ठरलेल्या गोंड राणी हिराई यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त विविध आदिवासी संघटना तसेच चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, चिमूर, गोंडपिपरी, सावली, मूल, पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी लॉकडाऊनमुळे घराघरात कौटुंबीक कार्यक्रम घेऊन अभिवादन केले.जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, आदिवासी विद्यार्थी संघाचे कंटू कोटनाके, संजू मडावी, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री मंगाम, आदी उपस्थित होते. बल्लारपूर व चंद्रपूर राजवटीत २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक होय. राणी हिराईचे माहेर मध्य प्रदेशातील मदनापूरचे. त्यांचे वडील सरदार होते. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच मिळाले. वीरशहा गादीवर बसला. राणी हिराईचा त्यांच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजवली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि राज्य कारभार बघू लागल्या. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला कल्याणकारी राज्य व्यवस्थेतून संस्कारीत केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. मात्र, त्याला निधड्या छातीने प्रतिकार केला. राणी स्वत: रणांगणावर उतरली. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. मात्र, राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर, महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा व हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविली, अशी माहिती प्रा.लक्ष्मण मंगाम यांनी दिली.चंद्रपूरच्या विकासात बहुमोल वाटा- आचार्य टी. टी. जुलमेचंद्रपूर नगरीच्या प्रजेचे हित जोपासत राणी हिराईने देखणी मंदिरे उभारली. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली चंद्रपुरातील मंदिरे व अन्य बआंधकाम केले. प्रजेला शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता पायाभूत सुविधा निर्माण केल्या. केवळ जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवून प्रजेला सुखी ठेवण्यात राणी हिराई यशस्वी झाल्या होत्या. त्या युद्ध कौशल्यात निपून होत्या. त्यामुळे राणी हिराईच्या कर्तृत्वाची दखल इतिहासकारांनी घेतली. राणी हिराईच्या कर्तृत्वामुळेच आजच्या चंद्रपूरला विकासाचे आधुनिक वळण घेतला आले, असे मत गोंड राजवटीचे अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक