चिमूर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:07+5:30

पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने साथ रोगांचा फैलाव होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते. या साथ रोगांमध्ये पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. म्हणून पाणी शुद्ध ठेवणे हे आरोग्य विभागाची जबाबदारी असते. यासाठी येथील प. स. आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे.

Green card to 88 gram panchayats in Chimur taluka | चिमूर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड

चिमूर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड

ठळक मुद्देपाच ग्रा. पं. ला पिवळे कार्ड : पाण्याच्या स्त्रोताचे सर्व्हेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : पंचायत समितीच्या पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने पाण्याच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना पिवळे तर ८८ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.
पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने साथ रोगांचा फैलाव होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते. या साथ रोगांमध्ये पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. म्हणून पाणी शुद्ध ठेवणे हे आरोग्य विभागाची जबाबदारी असते. यासाठी येथील प. स. आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे. त्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल महिन्यात तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमधील गावांतील पाण्याच्या स्त्रोताच्या स्वच्छता सर्व्हेक्षणानुसार पाच ग्रामपंचायतींना पिवळे तर ८८ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कोरोनासोबतच साथ रोगांच्या आजाराचा सामना करण्याचे दुहेरी संकट आरोग्य विभागासमोर उभे टाकले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगांबर मेश्राम, आरोग्य विस्तार अधिकारी वाय. बी. लांडगे यांनी साथ रोग रोखण्यासाठी उपाय योजना आखल्या आहेत. एप्रिल महिन्यातील पाण्याच्या सर्व्हेक्षणात एकही ग्रामपंचायतीला रेड कार्ड देण्यात आले नाही.

पिवळ्या कार्ड प्राप्त ग्रामपंचायत
खडसंगी, सावरला, कवठाला, मासळ व पिपरडा या पाच ग्रामपंचायतचा पिवळ्या कार्डमध्ये समावेश आहे. या ग्रामपंचायतना आरोग्य विभागाने पाण्याच्या स्रोतामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पाण्याच्या गुणवत्तेवर दिले जाते कार्ड
पाणी स्त्रोताच्या सर्व्हेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखमीसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तीव्र जोखीमसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जातात. शून्य ते ३५ गुणांपर्यंत हिरवे कार्ड, ३६ ते ६५ गुणांपर्यंत पिवळे व ६५ पेक्षा जास्त गुणांवर लालकार्ड दिले जाते. तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणी स्त्रोत पिण्यास योग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या स्त्रोतांमध्ये उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आरोग्य विस्तार अधिकारी वाय. बी. लांडगे यांनी सांगितले.

Web Title: Green card to 88 gram panchayats in Chimur taluka